Credit Card Default : गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. त्याचबरोबर बँकांनीही मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्ड देण्यात सुरुवात केलीये. याशिवाय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास अनेक ऑफर्सही मिळतात, ज्यामुळे लोक त्याकडे आकर्षित झाले आहेत. मात्र, क्रेडिट कार्डधारकांची संख्या वाढली असली तरी लोकही त्याच वेगानं क्रेडिट कार्ड डिफॉल्टर बनत आहेत, ज्याचे अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत.
थकबाकीदारांची संख्या वाढतेय
खरं तर क्रेडिट कार्डच्या थकबाकीचं लिमिट सातत्यानं वाढत आहे, ज्यामुळे क्रेडिट कार्डवरून कर्ज घेणाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ट्रान्सयुनियन सिबिलच्या आकडेवारीचा हवाला देत, क्रेडिट कार्ड डिफॉल्ट मार्च २०२३ मध्ये १.६% च्या तुलनेत जून २०२४ मध्ये १.७% वरून १.८% पर्यंत वाढल्याचं म्हटलं.
जून २०२४ पर्यंत २.७ लाख कोटींची थकबाकी
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जून २०२४ पर्यंत क्रेडिट कार्डवरील थकबाकीची रक्कम सुमारे २.७ लाख कोटी रुपये होती, तर मार्च २०२४ मध्ये २.६ लाख कोटी रुपये आणि मार्च २०२३ मध्ये २ लाख कोटी रुपयांपेक्षा थोडी जास्त होती. तर २०१९ मध्ये कोरोना संकटापूर्वी एकूण थकित रक्कम ८७,६८६ कोटी रुपये होती.
थकबाकीदार असाल तर हे नुकसान होऊ शकतं
क्रेडिट कार्डचं बिल अनेक महिने सलग न भरल्यास तुमचं खातं डिफॉल्ट होतं. खरं तर, जर आपण ३० दिवसांच्या आत रक्कम भरली नाही तर पहिलं क्रेडिट खातं ड्यू होईल, जर आपण सलग ६ महिने बिल भरलं नाही तर आपल्याला डिफॉल्ट कॅटेगरी म्हणून मार्क केलं जातं, त्यानंतर बँक आपल्याशी संपर्क साधेल आणि आपल्याला बिल भरण्यासाठी सांगेल. पण त्यानंतरही जर तुम्ही पैसे भरू शकत नसाल तर तुम्हाला डिफॉल्ट ठरवून अकाऊंट बंद केलं जातं. यानंतर तुम्हाला भविष्यात कर्ज किंवा क्रेडिट कार्ड दिले जाणार असंही शक्यता निर्माण होऊ शकते.