Join us

लय भारी ! Google देतेय १५ हजारांचं कर्ज; १११ रुपयांनी करा परतफेड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 1:19 PM

युजर्संना कुठल्याही बँकेच्या पायऱ्या न झिजवता किंवा कुठल्याही कार्यालयात चकरा न मारता हे लोन मिळणार आहे.

जगातील दिग्गज टेक कंपनी असलेल्या गुगलने युजर्संना नेहमीच वेगवेगळ्या सेवा पुरवल्या आहेत. गुगलच्या सेवेचा लाभ देशातील कोट्यवधी भारतीय घेत आहेत. आता, गुगलने पेमेंट अॅपही लाँच केले असून या अॅपच्या माध्यमातून युजर्संना सैश लोन देण्याची नवीन स्कीम सुरू केली आहे. गुगलच्या या नवीन योजनेचाल लाभ लहान-सहान व्यवसायिकांना होणार आहे. कारण, या योजनेतून युजर्संना १५ हजार रुपयांचे लोन मिळणार असून सैशे लोन नावाने गुगलने ही योजना सुरू केली आहे. 

युजर्संना कुठल्याही बँकेच्या पायऱ्या न झिजवता किंवा कुठल्याही कार्यालयात चकरा न मारता हे लोन मिळणार आहे. सैश लोन हे एकप्रकारचे प्री-एप्रुव्हड लोन आहे. ७ दिवसांपासून ते १२ महिन्यांपर्यंत या कर्जाची मुदत आहे. गुगलने ट्विट करुन या सैश लोनबद्दल माहिती दिली आहे. 

आम्ही पाहिलं की छोट्या व्यापाऱ्यांना नेहमीच छोट्या कर्जाची आवश्यकता असते. तसेच, समान आणि सुयोग्य हफ्त्यात हे कर्ज परतफेड करता यावे, ही त्यांची भावना असते. लहान-सहान व्यापाऱ्यांची ही गरज लक्षात घेऊनच गुगलने सैश लोन योजना सुरू केली आहे. Google Pay, @DMIFinance सोबत या योजनेचा लाभ युजर्संना घेता येईल. त्यानुसार, १५ हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, विशेष म्हणजे दरमहा १११ रुपयांचा हफ्ता भरुन हे लोन फेडता येणार आहे. गुगलने ४ बँकांसोबत यासंदर्भात करार केला आहे. 

आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, फेडरल आणि एचडीएफसी बँकेसमवेत गुगल करार केला असून युजर्संना सैश लोन योजनेसाठी लाभदायी ठरणार आहे. 

कसे मिळेल लोन

गुगलची ही लोन सुविधा सध्या २ टीअर शहरांमध्येच उपलब्ध आहे. सर्वप्रथम युजर्संना गुगल प्ले स्टोअरवरुन Google Pay for Businessइन्स्टॉल करुन घ्यावे लागेल. लोन सेक्शनमध्ये जाऊन ऑफर बटणावर क्लीक करायेथे लोनची रक्कम पाहून पुढे जावे लागेलकेवायसी सह इतर काही स्टेप तुम्हाला पूर्ण कराव्या लागतीलत्यानंतर, तुम्हाला कर्जपुरवठा होईल.  

टॅग्स :गुगलव्यवसायबँकिंग क्षेत्र