Lokmat Money >बँकिंग > SBI च्या ग्राहकांचं टेन्शन संपलं! PPF अकाऊंटशी निगडीत आली मोठी अपडेट

SBI च्या ग्राहकांचं टेन्शन संपलं! PPF अकाऊंटशी निगडीत आली मोठी अपडेट

ग्राहकांसाठी सेवा अधिक सुलभ करण्यासाठी बँका निरनिराळ्या सुविधा पुरवत असतात. एसबीआयनं ग्राहकांसाठी आता एक उत्तम सुविधा दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 09:27 AM2023-10-17T09:27:57+5:302023-10-17T09:29:35+5:30

ग्राहकांसाठी सेवा अधिक सुलभ करण्यासाठी बँका निरनिराळ्या सुविधा पुरवत असतात. एसबीआयनं ग्राहकांसाठी आता एक उत्तम सुविधा दिली आहे.

The tension of the customers of SBI is over Big update related to PPF account can open sitting at home any branch | SBI च्या ग्राहकांचं टेन्शन संपलं! PPF अकाऊंटशी निगडीत आली मोठी अपडेट

SBI च्या ग्राहकांचं टेन्शन संपलं! PPF अकाऊंटशी निगडीत आली मोठी अपडेट

ग्राहकांसाठी सेवा अधिक सुलभ करण्यासाठी बँका निरनिराळ्या सुविधा पुरवत असतात. आता त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियानंही आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर (SBI Offers) आणली आहे. तुमचंही एसबीआयमध्ये खाते असेल आणि तुम्ही पीपीएफ खाते उघडण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण एसबीआयच्या नवीन ऑफर अंतर्गत ग्राहकांना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खातं (Public Provident Fund) उघडण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.

आता ऑनलाइन पीएफ खाते घरबसल्या उघडता येणार आहे. फक्त यासाठी तुम्हाला काही प्रक्रियेचं पालन करावं लागणार आहे. पोस्ट ऑफिसमधूनही पीपीएफ खातं उघडता येतं. 

या बाबींची पूर्तता आवश्यक

  1. तुम्हाला पीएफ खातं ऑनलाइन उघडायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बचत खात्याचं केवायसी. केवायसी नसेल तर ते लवकर पूर्ण करा.
  2. आधार क्रमांक बचत खात्याशी जोडलेला असावा.
  3. मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असावा.
  4. तुम्हाला पीएफ खात्यात दरवर्षी किमान ५०० रुपये गुंतवावे लागतील. कोणतीही व्यक्ती या खात्यांमध्ये जास्तीत जास्त १,५०,००० रुपये गुंतवू शकते.


ऑनलाइन खातं ओपन करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुमच्या एसबीआय इंटरनेट बँकिंगद्वारे लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला Request and enquiries क्लिक करावं लागेल.
  • यानंतर 'New PPF Accounts’चा पर्याय निवडा.
  • क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल. ज्यावर तुमची माहिती दिसेल.
  • तुम्हाला ज्या शाखेत पीएफ खातं उघडायचं आहे त्याचा कोड टाका.
  • तुमची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि व्हेरिफाय करा.
  • सबमिट वर क्लिक करताच फॉर्म सबमिट केला जाईल. त्यानंतर रेफरन्स नंबर तुमच्या समोर येईल. ज्याद्वारे तुम्हाला फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
  • अर्जाची प्रिंटआउट घेतल्यानंतर, तीस दिवसांच्या आत तुमच्या फोटो आणि केवायसी कागदपत्रांसह ते बँकेत जमा करा.

Web Title: The tension of the customers of SBI is over Big update related to PPF account can open sitting at home any branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.