bank cheques : सामान्यत: बँका बचत खातेधारकांना चेकबुक देतात. बँकेकडून चालू खातेधारक आणि बचत खातेधारक दोघांनाही धनादेश दिले जातात. UPI आणि डिजिटल व्यवहारांच्या या युगातही चेकचे महत्त्व अबाधित आहे. म्हणूनच लोक मोठ्या व्यवहारांमध्ये चेक वापरण्यास प्राधान्य देतात. चेक हा आर्थिक व्यवहाराचा पुरावा मानला जातो. तुम्हीही अनेकवेळा चेकद्वारे कुणाला पैसे दिले असतील. तुम्हाला माहीत आहे का बँक चेकचे ९ प्रकार आहेत? कोणता चेक कुठे आणि कधी वापरला जातो हे माहित आहे का?
बेअरर चेक : बेअरर चेकवर ज्या व्यक्तीचे नावे लिहिले असेल तोच व्यक्ती पैसे काढू शकतो. बेअरर चेकला 'पेयबल टू बेअरर' चेक देखील म्हणतात.
ऑर्डर चेक : ऑर्डर चेकमध्ये ज्यामध्ये पैसे देणाऱ्याच्या नावापुढे "किंवा ऑर्डर" असे शब्द लिहिलेले असतात. याला "payable to order" चेक देखील म्हणतात.
क्रॉस चेक : क्रॉस केलेल्या चेकमध्ये, चेक देणारा धनादेशाच्या कोपऱ्याच्या वरच्या बाजूला २ समांतर रेषा काढतो. यावर “a/c payee” लिहिलेले असो किंवा नसो. हा चेक कोणीही सादर केला तरीही, चेकमध्ये नाव असलेल्या व्यक्तीच्या खात्यात व्यवहार होतो. क्रॉस चेकचा फायदा असा आहे की यामुळे अनधिकृत व्यक्तीला पैसे दिले जाण्याचा धोका कमी होतो.
ओपन चेक : ओपन चेकला कधीकधी अनक्रॉस केलेले धनादेश म्हणतात. ज्या चेकवर क्रोस केलेले नसते तो ओपन चेक श्रेणी अंतर्गत येतो. हा धनादेश संबंधित बँकेत सादर केला जाऊ शकतो. यामध्ये चेक सादर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पैसे दिले जातात.
पोस्ट-डेटेड चेक : वास्तविक जारी केलेल्या तारखेपेक्षा नंतरच्या चेकला पोस्ट-डेटेड चेक म्हणतात. हा धनादेश जारी केल्यानंतर तो कधीही संबंधित बँकेकडे सादर केला जाऊ शकतो. परंतु, धनादेशावर दिलेल्या तारखेपर्यंत पैसे प्राप्तकर्त्याच्या खात्यातून हस्तांतरित केले जात नाहीत.
स्टेल चेक : याला मुदत संपलेला चेक म्हणतात. याद्वारे कोणतेही आर्थिक व्यवहार होत नाही. याचा अवधी सुरुवातीला सहा महिने होता. आता तो कमी करुन ३ महिन्यापर्यंत कमी करण्यात आला आहे.
प्रवासी चेक : हा चेक सर्वत्र स्वीकृत चलनाच्या समतुल्य मानला जाऊ शकतो. प्रवासी चेक जवळजवळ सर्वत्र उपलब्ध असून विविध किमतीत येतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी बँकेने दिलेला हा धनादेश आहे. ट्रॅव्हलर्स चेकची कालबाह्यता तारीख नसते आणि ते तुमच्या पुढच्या प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या सहलीवरून परतल्यानंतर तुमच्याकडे ते रिडीम करण्याचा पर्याय देखील आहे.
सेल्फ चेक : जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला चेक जारी करते तेव्हा त्याला सेल्फ-चेक म्हणतात. यामध्ये नावाच्या कॉलममध्ये ‘सेल्फ’ हा शब्द लिहिला आहे. जेव्हा खातेदाराला स्वतःच्या वापरासाठी बँकेतून रोख रक्कम काढायची असेत. त्यावेळी याचा वापर होतो.
बँकर्स चेक : बँकरचा धनादेश हा बँकेने खातेदाराच्या वतीने जारी केलेला धनादेश आहे. आदेशाने निश्चित केलेली रक्कम त्याच शहरातील दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी आहे.