Lokmat Money >बँकिंग > भरमसाठी शुल्क भरण्याची गरज नाही; 'हे' आहेत ५ लाइफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड, खर्चावर होईल बंपर बचत

भरमसाठी शुल्क भरण्याची गरज नाही; 'हे' आहेत ५ लाइफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड, खर्चावर होईल बंपर बचत

Life Time Free Credit Cards : आता क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी भरमसाठी शुल्क भरण्याची गरज पडणार नाही. कारण, काही बँका तुम्हाला लाइफटाईम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:09 AM2024-10-16T11:09:54+5:302024-10-16T11:11:29+5:30

Life Time Free Credit Cards : आता क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी भरमसाठी शुल्क भरण्याची गरज पडणार नाही. कारण, काही बँका तुम्हाला लाइफटाईम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर करत आहेत.

these 5 credit cards are life time free you will get huge savings on shopping and booking | भरमसाठी शुल्क भरण्याची गरज नाही; 'हे' आहेत ५ लाइफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड, खर्चावर होईल बंपर बचत

भरमसाठी शुल्क भरण्याची गरज नाही; 'हे' आहेत ५ लाइफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड, खर्चावर होईल बंपर बचत

Life Time Free Credit Cards : दिवाळी तोंडावर आली असून लोक खरेदीचा आनंद लुटत आहे. खरेदी म्हटलं की क्रेडिट कार्ड हा शब्द आपल्या ओठांवर येतोच. क्रेडिट कार्ड आज आपल्या गरजांपैकी एक बनले आहे. सध्या त्याशिवाय खरेदी, तिकीट बुकिंग, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्सची कल्पना करणे कठीण झाले आहे. मात्र, क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्काच्या नावाखाली बँका दरवर्षी भरमसाठ शुल्क आकारतात. ह्या शुल्काशिवाय तुम्ही क्रेडिट कार्डमध्ये उपलब्ध सुविधांचा आनंद घेऊ शकता. आम्ही तुम्हाला ५ बेस्ट क्रेडिट कार्डांबद्दल माहिती सांगणार आहोत. ही कार्डे लाईफटाईम मोफत आहेत.

RBL Bank Bank Credit Card

  • हे क्रेडिट कार्ड एक्सप्रेस कॅश तुम्हाला तुमच्या खात्यात त्वरित पैसे मिळवू देते.
  • BookMyShow आणि Zomato वरुन तुम्ही ऑर्डर केल्यास १०% कॅशबॅक मिळते.
  • EMI इन्फिनिटी पास स्प्लिट एन पे शुल्कावर १००% पर्यंत सूट देते.
  • आरबीएल बँक मायकार्ड ॲप तुम्हाला तुमची क्रेडिट कार्ड मॅनेज करण्यास, युटिलिटी बिले भरण्यासाठी, मर्चेंट ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि कर्जासाठी अर्ज करण्यास परवानगी देते.

Amazon Pay ICICI credit card

  • या क्रेडिट कार्डमध्ये अनलिमिटेड रिवॉर्ड मिळत असून ते एक्सपायर होत नाहीत. 
  • तुम्ही Amazon वरून खरेदीसाठी रिवॉर्ड पॉइंट वापरू शकता. 
  • जेव्हा तुम्ही या क्रेडिट कार्डने Amazon वर खरेदी करता तेव्हा तुम्हाला ३ किंवा सहा महिन्यांसाठी विनाखर्च EMI पर्याय मिळतो. 
  • Amazon Prime ग्राहकांना Amazon India वरील खरेदीवर ५% रिवॉर्ड मिळतात.

ICICI Bank Platinum Chip credit card

  • या क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला पेट्रोल वगळता किरकोळ स्टोअरमध्ये १०० रुपयांच्या प्रत्येक खरेदीवर दोन रिवॉर्ड पॉइंट मिळतात.
  • विमा आणि युटिलिटीजवर खर्च केलेल्या प्रत्येक १०० रुपयांसाठी एक रिवॉर्ड पॉइंट मिळतो.
  • संपूर्ण भारतातील HPCL पंपांवर १% इंधन अधिभार सवलत (४,००० रुपयांपर्यंत) मिळवता येतो.
  • लक्झरी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, लाइफस्टाइल रिटेलर आणि स्पा येथे उत्तम डील उपलब्ध आहेत.

IDFC First Millennium Credit Card

  • कार्डधारकाने त्याच्या वाढदिवसाला २०,००० पेक्षा जास्त खर्च केल्यास १० पट रिवॉर्ड पॉइंट मिळतात.
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या २०,००० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर कार्ड 3x रिवॉर्ड पॉइंट ऑफर आहे.
  • कार्ड विमा प्रीमियम आणि युटिलिटी बिल पेमेंटसाठी 1x रिवॉर्ड पॉइंट ऑफर करते.

IndusInd Platinum Credit Card

  • नोंदणी शुल्क भरण्यावर तुम्हाला आघाडीच्या ब्रँडकडून लक्स गिफ्ट कार्ड आणि व्हाउचर मिळतात. 
  • भारतातील सर्व गॅस पंपांवर १% इंधन शुल्क सवलत आहे. (४०० ते ४००० रुपये दरम्यान उपलब्ध आहे. 
  • या कार्डधारकाला २५ लाखांपर्यंतचे फ्लाइट अपघात विमा संरक्षण असून १ लाखांपर्यंतचे हरवलेले सामान विमा संरक्षण मोफत मिळते.
  • तुम्ही १५० रुपये जरी खर्च केले तरी १.५ रिवॉर्ड पॉईंट मिळतात.
  • UPI व्यवहारांवर खर्च केलेल्या प्रत्येक १०० रुपयांसाठी हे कार्ड २ रिवॉर्ड पॉइंट देते.
     

Web Title: these 5 credit cards are life time free you will get huge savings on shopping and booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.