Join us  

गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या कोणते लोन नेमके चांगले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 11:29 AM

सणासुदीच्या काळात कार खरेदीसाठी कार लोन घ्यावे की पर्सनल लोन, याबाबत अनेकजण द्विधा मन:स्थितीत असतात.

सणासुदीच्या काळात कार खरेदीसाठी कार लोन घ्यावे की पर्सनल लोन, याबाबत अनेकजण द्विधा मन:स्थितीत असतात. कार लोनमध्ये गाडी कर्जदात्याकडे गहाण असते, पर्सनल लोनमध्ये गाडी गहाण ठेवण्याची गरज नसते. पण, व्याजामध्ये फरक पडतो. दोन्ही कर्जातील तफावत आज जाणून घेऊया.

कोणते कर्ज सुरक्षित?पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज आहे. कार लोन मात्र सुरक्षित कर्ज आहे. पर्सनल लोन देताना वित्तीय संस्था अर्जदाराचे मासिक उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर पाहते. कार लोनमध्ये या बाबींशिवाय वाहनाची किंमतही पाहिली जाते. उदा. तुम्ही १५ लाखांची कार खरेदी करू इच्छित असाल, तर बँक किमतीच्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत सहजपणे कर्ज देते. काही बँका परतफेडीची क्षमता पाहून १०० टक्के कर्जही देतात.

नेमके होते काय?कार लोनमध्ये कर्ज फिटेपर्यंत गाडी बँकेकडे गहाण असते. गाडीची कागदपत्रे बँकेकडेच असतात. कर्ज फेडले नाही, तर गाडी विकून बँक कर्ज वसूल करू शकते. पर्सनल लोनमध्ये केवळ तुमचे उत्पन्न आणि कर्ज इतिहास पाहून तुम्हाला कर्ज दिले जाते. कोणतीही मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवण्याची गरज नसते.

व्याजदर अधिक कुणाचा?मात्र, पर्सनल लोन असुरक्षित श्रेणीतील कर्ज असल्यामुळे त्याचा व्याजदर अधिक असतो. कार लोनचा व्याजदर कमी असतो. कर्ज घेण्यापूर्वी दोघांच्या व्याजदराची तुलना करून घ्यावी. सोबतच अटी व शर्तीही तपासून घ्यायला हव्यात. आपल्या आवाक्यात असलेल्या कर्जाची निवड करणे कधीही हिताचे असते.

 

टॅग्स :कारबँक