Lokmat Money >बँकिंग > सणासुदीच्या काळात घर खरेदीचा विचार करताय? या ५ बॅंका देतायत स्वस्त Home Loan

सणासुदीच्या काळात घर खरेदीचा विचार करताय? या ५ बॅंका देतायत स्वस्त Home Loan

तुम्ही नजीकच्या काळात गृहकर्ज घेऊन घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 01:39 PM2023-09-16T13:39:06+5:302023-09-16T13:39:36+5:30

तुम्ही नजीकच्या काळात गृहकर्ज घेऊन घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Thinking of buying a home during the festive season These 5 banks offer cheap home loans know rate of interest | सणासुदीच्या काळात घर खरेदीचा विचार करताय? या ५ बॅंका देतायत स्वस्त Home Loan

सणासुदीच्या काळात घर खरेदीचा विचार करताय? या ५ बॅंका देतायत स्वस्त Home Loan

तुम्ही नजीकच्या काळात गृहकर्ज घेऊन घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गृहकर्जाचे व्‍याजदर ग्राहकाचा सिबिल (CIBIL) स्कोअर, पगार, नोकरी आणि कर्जाचा कालावधी यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. गृहकर्जावर आकारलं जाणारं व्याज हे आरबीआयच्या निर्णयावर अवलंबून असते. मात्र, अनेक बँकांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात बरीच तफावत आहे. दरम्यान, आज आपण जाणून घेऊ कोणत्या बँका तुम्हाला कमी दरात व्याज देत आहेत.

HDFC Bank
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी आपल्या ग्राहकांना होमलोनवर किमान ८.५० टक्क्यांपासून ते कमाल ९.४० टक्क्यांपर्यंतचं व्याज आकारते.

Indian Bank
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी असलेली एक बँक होमलोनवर ८.५० टक्के ते ९.९० टक्क्यांपर्यंतचे व्याजदर आकारते.

Punjab National Bank
जर तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला किमान ८.५० टक्के ते कमाल १०.१० टक्क्यांपर्यंत व्याज द्यावं लागेल.

Indusind Bank
इंडसइंड बँक आपल्या होमलोनच्या ग्राहकांना किमान ८.५० टक्के ते कमाल १०.५५ टक्क्यांपर्यंत व्याज आकारते.

Bank of India
बँक ऑफ इंडिया आपल्या होमलोन ग्राहकांसाठी ८.५० टक्के ते कमाल १०.६० टक्क्यांपर्यंत व्याजदर ऑफर करते.

काय असतो सिबिल स्कोअर
सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० अंकांच्यादरम्यान असतो. तुमचा क्रेडिट किंवा सिबिल स्कोअर जितका अधिक असेल तितक्या कमी व्याजदरात तुम्हाला कर्ज मिळेल. देशातील बहुतांश बँकांनी लोन देण्यासाठी किमान सिबिल स्कोल ६८५ निश्चित केला आहे.

Web Title: Thinking of buying a home during the festive season These 5 banks offer cheap home loans know rate of interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.