Lokmat Money >बँकिंग > उच्च शिक्षणासाठी लोन घेण्याचा विचार आहे? त्यापूर्वी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

उच्च शिक्षणासाठी लोन घेण्याचा विचार आहे? त्यापूर्वी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणे हा मोठा आर्थिक निर्णय असू शकतो. त्यामुळे यासाठी काही बाबींकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 11:36 AM2023-06-21T11:36:38+5:302023-06-21T11:37:05+5:30

उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणे हा मोठा आर्थिक निर्णय असू शकतो. त्यामुळे यासाठी काही बाबींकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे.

Thinking of taking a loan for higher education Know this important information before bank education loan interest rates documents | उच्च शिक्षणासाठी लोन घेण्याचा विचार आहे? त्यापूर्वी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

उच्च शिक्षणासाठी लोन घेण्याचा विचार आहे? त्यापूर्वी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

Education Loan: अनेकदा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतात. परंतु तेथील शिक्षणाची फी आणि इतर खर्चासाठी एज्युकेशन लोनचा पर्याय स्वीकारतात. उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणे हा मोठा आर्थिक निर्णय असू शकतो. अशा परिस्थितीत अनेक गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी कोणत्या बाबींची माहिती असणं आवश्यक आहे ते पाहू.

पात्रता: सर्वप्रथम तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात की नाही हे जाणून घ्या. यासोबतच कर्ज देणाऱ्या बँक आणि वित्तीय संस्थांची चौकशी करणं आवश्यक आहे.

व्याजदर: बँकांनी दिलेल्या व्याजदरांची तुलना करुन पाहावी. कमी व्याजदरात कर्ज देणाऱ्या बँकांकडून तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.

कर्जाची रक्कम: तुम्हाला किती रक्कम आवश्यक आहे हे निश्चित करा. कर्जाची रक्कम वेगवेगळ्या बँकांकडून वेगळी असू शकते. कर्जाच्या रकमेची गणना करताना, तुमची ट्युशन फी, राहण्याचा खर्च, अभ्यास साहित्याचा खर्च आणि इतर संबंधित खर्च विचारात घ्या.

कर्ज परतफेडीचा कालावधी: काही बँका तुम्हाला शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी देतात. तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे कर्जाची परतफेड करण्यापूर्वी पुरेसा वेळ असतो.

अनुदान किंवा योजना: शैक्षणिक कर्जाच्या काही योजना सरकारकडूनही चालवल्या जातात. शैक्षणिक कर्जावरही शासन अनुदान देते. याचा फायदा घेतल्यास कर्जाची रक्कम लवकर फेडता येईल.

कागदपत्रे: कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कागदपत्रं. तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रं जसं की ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाची कागदपत्रे, शैक्षणिक रेकॉर्ड आणि संस्थेचे प्रवेशपत्र असणं आवश्यक आहे.

Web Title: Thinking of taking a loan for higher education Know this important information before bank education loan interest rates documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.