Lokmat Money >बँकिंग > परदेशात फिरायला जाण्याचा विचार करताय? हे क्रेडिट कार्ड्स देतील फ्लाईट्स, हॉटेल्सवर बेस्ट डिस्काऊंट

परदेशात फिरायला जाण्याचा विचार करताय? हे क्रेडिट कार्ड्स देतील फ्लाईट्स, हॉटेल्सवर बेस्ट डिस्काऊंट

नवीन वर्षात तुम्ही परदेशवारीचं नियोजन करत आहात का? किंवा तुम्ही बिझनेस टूर्समुळे अनेकदा परदेशात फिरता का? त्यामुळे जर तुम्हाला असे क्रेडिट कार्ड हवे असेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्रवासात फायदा मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 02:54 PM2022-12-27T14:54:41+5:302022-12-27T14:55:28+5:30

नवीन वर्षात तुम्ही परदेशवारीचं नियोजन करत आहात का? किंवा तुम्ही बिझनेस टूर्समुळे अनेकदा परदेशात फिरता का? त्यामुळे जर तुम्हाला असे क्रेडिट कार्ड हवे असेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्रवासात फायदा मिळेल.

Thinking of traveling abroad These credit cards will give you the best discounts on flights and hotels hdfc icici standard chartered | परदेशात फिरायला जाण्याचा विचार करताय? हे क्रेडिट कार्ड्स देतील फ्लाईट्स, हॉटेल्सवर बेस्ट डिस्काऊंट

परदेशात फिरायला जाण्याचा विचार करताय? हे क्रेडिट कार्ड्स देतील फ्लाईट्स, हॉटेल्सवर बेस्ट डिस्काऊंट

नवीन वर्षासाठी तुम्ही परदेशवारीचे नियोजन करत आहात का? किंवा तुम्ही बिझनेस टूर्समुळे अनेकदा परदेशात फिरता का? त्यामुळे जर तुम्हाला असे क्रेडिट कार्ड हवे असेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्रवासात फायदा मिळेल. तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय प्रवासासाछी योग्य क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला अनेक रिवॉर्ड्स मिळू शकतात. तसेच तुम्ही फ्लाइट बुकिंग, हॉटेलातील मुक्काम, मेंबरशीप इत्यादींवर बचत करू शकता. तुम्ही फॉरेन एक्सजेंच मार्कवरही पैसे वाचवू शकता. जाणून घेऊया अशीच क्रेडिट कार्ड्स जी तुमच्या परदेशवारीमध्येही बचत करून देऊ शकतात.

आयडीएफसीफर्स्टवेल्थ (IDFC First Wealth)
IDFC फर्स्ट वेल्थ क्रेडिट कार्ड आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर 1.5 टक्के फॉरेक्स मार्कअप शुल्क आकारते. कार्डधारक प्रत्येक तिमाहीत 4 एअरपोर्ट लाउंज वापरू शकतो. बँक 900 हून अधिक लक्झरी हॉटेल्ससाठी प्रीमियम लाभ देते. हे 1500 हून अधिक रेस्टॉरंटमध्ये 20 टक्के सूट देते. या कार्डचे वार्षिक शुल्क शून्य आहे.

स्टँडर्डचार्टेर्ड EaseMyTrip क्रेडिटकार्ड (Standard Chartered EaseMyTrip Credit Card)
स्टँडर्ड चार्टर्ड EaseMyTrip क्रेडिट कार्ड वेबसाइट आणि अॅपवर हॉटेल आणि फ्लाइट बुकिंगवर 20 टक्के आणि 10 टक्के सूट देते. कार्डधारकाला बस तिकीट बुकिंगवर 125 रुपयांची सूट मिळते. हे स्टँडअलोन हॉटेल आणि एअरलाइन वेबसाइट्स, अॅप्स किंवा आउटलेटवर तिकीट बुक करण्यासाठी रिवॉर्डही देते. या कार्डसाठी वार्षिक शुल्क 350 रुपये आहे.

एचडीएफसीबँक इंटरमाइल्स (HDFC Bank intermiles)
HDFC बँक इंटरमाईल हे एक सिग्नेचर क्रेडिट कार्ड आहे जे पहिल्या 30 दिवसांमध्ये जॉयनिंगवर 8 हजारांपर्यंत इंटरमाईल्स आणि 6 हजार खर्च केल्यावर 3 हजार इंटरमाईल्सपर्यंत बोनस ऑफर करते. हे 750 रुपयांचे फ्लाइट डिस्काउंट व्हाउचर आणि 2,000 रुपयांचे हॉटेल डिस्काउंट व्हाउचर देखील देते. कार्डधारक इंटरमाइल्स वेबसाइटद्वारे फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी इंटरमाइल्सला रिडीमदेखील करू शकतात. हे व्हिसा आणि मास्टरकार्ड नेटवर्क क्रेडिट कार्ड धारकांना दरवर्षी 16 लाउंज ॲक्सेस देते. या कार्डसाठी वार्षिक शुल्क 2,500 रुपये आहे.

Web Title: Thinking of traveling abroad These credit cards will give you the best discounts on flights and hotels hdfc icici standard chartered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक