Lokmat Money >बँकिंग > FD वर ही खासगी बँक देतेय ८.२५ टक्क्यांचं व्याज, इतक्या दिवसांसाठी करावी लागणार गुंतवणूक

FD वर ही खासगी बँक देतेय ८.२५ टक्क्यांचं व्याज, इतक्या दिवसांसाठी करावी लागणार गुंतवणूक

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील खाजगी आणि सरकारी बँका त्यांच्या मुदत ठेवींचे व्याजदर वाढवत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 09:37 PM2023-02-18T21:37:18+5:302023-02-18T21:37:39+5:30

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील खाजगी आणि सरकारी बँका त्यांच्या मुदत ठेवींचे व्याजदर वाढवत आहेत.

This private indusind bank is giving 8 25 percent interest on FD the investment has to be done for how many days repo rate rbi | FD वर ही खासगी बँक देतेय ८.२५ टक्क्यांचं व्याज, इतक्या दिवसांसाठी करावी लागणार गुंतवणूक

FD वर ही खासगी बँक देतेय ८.२५ टक्क्यांचं व्याज, इतक्या दिवसांसाठी करावी लागणार गुंतवणूक

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील खाजगी आणि सरकारी बँका त्यांच्या मुदत ठेवींचे व्याजदर वाढवत आहेत. देशातील खासगी बँकांपैकी एक असलेल्या इंडसइंड बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक सध्या सर्वसामान्यांना 3.5 टक्के ते 7 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 4.00 टक्के ते 7.50 टक्के व्याज देत आहे. बँक 7 दिवसांपासून ते 61 महिन्यांपर्यंतच्या मुदत ठेवींवर हा व्याजदर देत आहे.

इंडसइंड बँक दोन वर्षे ते तीन वर्षे आणि तीन महिन्यांच्या FD वर सामान्य लोकांना 7.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के दराने व्याज देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर 16 फेब्रुवारी 2022 पासून लागू झाले आहेत. इंडसइंड बँकेच्या म्हणण्यानुसार, सात दिवस ते 30 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 3.50 टक्के दराने व्याज मिळेल. पुढील 31 दिवस ते 45 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 4.00 टक्के दराने व्याज मिळेल.

तीन वर्षांपर्यंत किती व्याज?
बँक एक वर्ष ते दीड वर्षांच्या एफडीवर 7 टक्के आणि एक वर्षापेक्षा जास्त सहा महिने ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे. बँक आता दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर जास्तीत जास्त 7.50 टक्के व्याजदर देत आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त परंतु 61 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 7.25 टक्के व्याजदर देत आहे. 61 महिने किंवा त्याहून अधिक मुदतीच्या एफडीवर सात टक्के दराने व्याज मिळेल.

120 दिवसांसाठी किती व्याज?
91 ते 120 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 4.75 टक्के दराने व्याज मिळेल, तर 121 ते 180 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 5 टक्के दराने व्याज मिळेल. इंडसइंड बँक आता 211 दिवस ते 269 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर 5.80 टक्के व्याज दर देत आहे. तर 270 दिवस ते 354 दिवसांच्या एफडीवर 6 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी 355 दिवस ते 364 दिवसांच्या ठेवींवर 6.25 टक्के व्याज मिळेल.

Web Title: This private indusind bank is giving 8 25 percent interest on FD the investment has to be done for how many days repo rate rbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.