हप्त्यांचा बोजा कमी करण्यासाठी आणि लाखांची रक्कम वाचवण्याच्या प्रकरणात लोन रिफायनान्सिंग मदतीचं ठरू शकतं. यामध्ये कमी व्याजदरावर तुम्हाला कर्ज घेता येऊ शकतं आणि जुनं लोन तुमचं क्लोझ केलं जातं. यानंतर तुमचं नवं लोन सुरू होतं. नवं लोन तुम्ही दुसऱ्या बँकेतूनही घेऊ शकता किंवा सध्याच्या बँकेतूनही घेऊ शकता. परंतु हा पर्याय वापरण तुम्हाला केव्हा फायद्याचं ठरू शकतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
कसा मिळतो फायदा?जेव्हा तुम्ही लोन रिफायनान्सिंगच्या नवीन कर्ज घेता, तेव्हा तुम्ही कर्ज परतफेडीची वेळ तुमच्यानुसार कमी किंवा वाढवू शकता. याशिवाय तुम्ही कमी व्याजदरानं नवीन कर्ज घेतल्यास तुमचा ईएमआयचा भार कमी होतो.
कधी निवडावा हा पर्याय
- तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेतलं आहे त्या बँकेचे व्याजदर खूप जास्त आहेत आणि तुम्हाला दुसऱ्या बँकेत कमी व्याजदराचा पर्याय मिळत आहे, तर अशा परिस्थितीत तुम्ही लोन रिफायनान्सिंगचा पर्याय निवडू शकता.
- जर तुम्ही निश्चित व्याजदरावर कर्ज घेतले असेल, परंतु त्यानंतर व्याजदर कमी होऊ लागले आहेत. तुम्हाला फिक्स्ड रेट लोनवरून फ्लोटिंग रेट लोनवर स्विच करायचं आहे. तुमची बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला फ्लोटिंग लोन पर्याय ऑफर करण्यास तयार नसल्यास, तुम्ही तुमचं कर्ज दुसर्या ठिकाणाहून रिफायनान्स करून घेऊ शकता.
- जर तुम्ही कर्ज घेताना दीर्घ कालावधीचा पर्याय निवडला असेल, परंतु आता तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि तुम्हाला कर्जाचा कालावधी कमी करायचा असेल, तर तुम्ही लोन रिफायनान्सचा पर्याय निवडून ते करू शकता.
- तुम्ही सध्याचा हप्ता भरण्यास सक्षम नसल्यास आणि हप्ता कमी करण्यासाठी कर्जाचा कालावधी वाढवू इच्छित असल्यास, तुम्ही हा पर्याय देखील निवडू शकता.