UPI Lite Wallet : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चनलधोरण बैठकीचे निर्णय अखेर समोर आले आहे. ईएमआय कमी होईल म्हणून डोळे लावून बसलेल्या कर्जदारांची निराशा झाली आहे. लागोपाठ दहाव्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने UPI Lite Wallet आणि UPI123 Pay बाबतही बदल जाहीर केले आहेत. आजकाल प्रत्येकजण अगदी भाजीच्या जुडी घेण्यापासून फ्लाईट बुकींग करण्यापर्यंत UPI किंवा UPI Lite वापरतो. UPI चा वाढता वापर लक्षात घेऊन RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI Lite द्वारे पेमेंटची मर्यादा वाढवली आहे.
UPI 123 पे म्हणजे काय?रिझर्व्ह बँकेने अलीकडेच UPI ची नवीन आवृत्ती UPI 123 Pay सादर केलं आहे. ही योजना खासकरुन फिचर फोन वापरणाऱ्यांसाठी लाँच करण्यात आली आहे. जे इंटरनेटशिवाय UPI व्यवहार करू शकतील. UPI 123Pay ही फीचर फोन वापरकर्त्यांसाठी एक झटपट पेमेंट सिस्टम आहे. यामध्ये युजर्स फिचर फोनद्वारे ४ वेगवेगळअया पर्यायांवर आधारित आर्थिक व्यवहार करू शकतात. यामध्ये IVR नंबरवर कॉल करणे, फीचर फोनमधील App बेस्ड पेमेंट, मिस्ड कॉल आणि प्रॉक्सिमिटी साउंड आधारित पेमेंट (Proximity Sound-Based Payments) यांचा समावेश आहे.
नवीन बदल काय?
- UPI 123 पे ची प्रति व्यवहार मर्यादा ५००० रुपयांवरून १०,००० रुपये करण्यात आली आहे.
- याशिवाय UPI Lite वॉलेटची मर्यादा देखील २,००० रुपयांवरून ५,००० रुपये करण्यात आली आहे.
- यासोबत UPI Lite ची प्रति व्यवहार मर्यादा १०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आली आहे.
UPI द्वारे तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंतचा कर भरू शकतायाशिवाय रिझर्व्ह बँकेने UPI द्वारे कर भरण्याची मर्यादाही वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास म्हणाले, "यूपीआयद्वारे कर भरण्याची मर्यादा आता प्रति व्यवहार १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
UPI चा वापर आणखी वाढेलPwC इंडियाच्या अहवालानुसार, २०२८-२९ पर्यंत UPI वर एकूण व्यवहार ४३९ अब्ज असतील जे सध्या १३१ अब्ज आहे. डिजिटल पेमेंटमध्ये ९१ टक्के वाढ होण्याची शक्यता यावरून दिसून येते.