Lokmat Money >बँकिंग > ... अन्यथा यूपीआय आयडी होणार ३१ डिसेंबरपासून बंद?

... अन्यथा यूपीआय आयडी होणार ३१ डिसेंबरपासून बंद?

तातडीने ॲक्टिव्ह करा; सरकारची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 07:48 AM2023-11-20T07:48:35+5:302023-11-20T07:49:02+5:30

तातडीने ॲक्टिव्ह करा; सरकारची सूचना

UPI ID will be closed from December 31? | ... अन्यथा यूपीआय आयडी होणार ३१ डिसेंबरपासून बंद?

... अन्यथा यूपीआय आयडी होणार ३१ डिसेंबरपासून बंद?

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : युनिफाईड पेमेंटस् इंटरफेस म्हणजेच यूपीआयने देशातील आर्थिक देवाणघेवाणीचे चित्र गेल्या काही वर्षांत आमूलाग्रपणे बदलून गेले आहे. परंतु युजर्सकडून पेमेंटसाठी यूपीआय आयडीचा वापर केला जात नसेल तर तो बंद केला जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. याबाबत ७ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली आहे. 

कधीपर्यंत असेल मुदत?  
एनपीसीआयने स्पष्ट केले आहे की, कोणताही आयडी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ॲक्टिव्ह केला नाही किंवा त्याचा एकदाही वापर करण्यात आला नसेल तर १ जानेवारी २०१४ पासून त्याला डीॲक्टिव्ह करण्यात येईल.

अधिसूचनेत काय ? 

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) काढलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे की, जर युजरने गुगल पे, पेटीएम किंवा फोनपे यांसारख्या ॲपद्वारे कोणत्याही प्रकारची आर्थिक किंवा बिगर आर्थिक देवाण-घेवाण संपूर्ण वर्षभरात एकदाही केली नसेल तर त्यांचा यूपीआय आयडी बंद करण्यात येईल.

Web Title: UPI ID will be closed from December 31?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.