Lokmat Money >बँकिंग > UPI जगात भारी, क्रिप्टोकरन्सी उद्योन्मुख बाजारपेठांसाठी धोकादायक : शक्तिकांत दास

UPI जगात भारी, क्रिप्टोकरन्सी उद्योन्मुख बाजारपेठांसाठी धोकादायक : शक्तिकांत दास

सध्या देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट्सची संख्या वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 03:53 PM2024-01-11T15:53:37+5:302024-01-11T15:53:53+5:30

सध्या देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट्सची संख्या वाढली आहे.

UPI is huge in the world contribution of private companies is important in making it successful rbi governor Shaktikanta Das | UPI जगात भारी, क्रिप्टोकरन्सी उद्योन्मुख बाजारपेठांसाठी धोकादायक : शक्तिकांत दास

UPI जगात भारी, क्रिप्टोकरन्सी उद्योन्मुख बाजारपेठांसाठी धोकादायक : शक्तिकांत दास

सध्या देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट्सची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीत डिजिटल पेमेंट्सच्या बाबतीत अमेरिकेसह अन्य विकसित देश खुप मागे आहेत. या यशाचं कारण आहे ते म्हणजे युपीआय. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युपीआय जगात भारी असल्याचं म्हटलंय.
 
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास गुरूवारी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. युपीआय जगात भारी आहे. ते वर्ल्ड लीडर ठरलं पाहिजे, असं दास म्हणाले. यावेळी त्यांनी देशात युपीआय यशस्वी करण्यासाठीच्या खासगी कंपन्यांच्या योगदानाचं कौतुक केलं.

असा वाढला वापर

सद्यस्थितीत युपीआय भारतातील पेमेंटचा प्रमुख माध्यम ठरत आहे. सध्या देशातील कानाकोपऱ्यातून युपीआयद्वारे पैशांची देवाण घेवाण होत आहे. यासाठी आरबीआय आणि एनपीसीआयनं सातत्यानं प्रयत्न केलेत. विना इंटरनेट पेमेंट करता यावं यासाठी काही महिन्यांपूर्वीच युपीआय लाईटही लाँच करण्यात आलं.  तर दुसरीकडे काही ठराविक ठिकाणी युपीआय पेमेंटची मर्यादा वाढवून १ लाखांपासून ५ लाख रुपये करण्यात आलं. दुसरीडे पेटीएम,  गुगल पे , अमेझॉन पे, फोन पे, भारत पे, मोबिक्विक सारख्या अॅप्सनंही युपीआयचा वापर वाढवण्यात मदत केली आहे. 

क्रिप्टोकरन्सी उद्योन्मुख बाजारपेठांसाठी धोकादायक

कार्यक्रमादरम्यान त्यांनी क्रिप्टोकरन्सीवरही भाष्य केलं. रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. या मार्गावर चालणं धोकादायक असल्याचे दास म्हणाले. यापूर्वीच त्यांनी उद्योन्मुख बाजारपेठांसाठी क्रिप्टोकन्सी धोकादायक असल्याचं वक्तव्य केलं होतं.

Web Title: UPI is huge in the world contribution of private companies is important in making it successful rbi governor Shaktikanta Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.