Join us  

UPI Lite X फीचर लाँच : विना नेटवर्क पाठवू शकता पैसे, पाहा कसं करतं काम?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 1:23 PM

युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI भारतात खूप लोकप्रिय आहे. पण इंटरनेट कनेक्टिव्हिटी अनेकदा युपीआय पेमेंटच्या मार्गात अडथळा ठरत होती.

युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI भारतात खूप लोकप्रिय आहे. पण इंटरनेट कनेक्टिव्हिटी अनेकदा युपीआय पेमेंटच्या मार्गात अडथळा ठरत होती. ही समस्या दूर करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयनं नुकतेच नवीन UPI ​​Lite X फीचर लाँच केलं आहे. या फीचरमुळे युजर्स ऑफलाइन पैसे ट्रान्सफर करू शकतात.

काय आहे युपीआय लाईट एक्सयुपीआय लाईट एक्सद्वारे ग्राहकांना कनेक्टिव्हीटी नसलेल्या ठिकाणीदेखील व्यवहार करता येणार आहे. ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही अशा ठिकाणी या फीचरचा अधिक वापर करता येईल. फोनमध्ये रिचार्जही नसेल तरीही युपीआय पेमेंट करताना कोणतीही समस्या येणार नाही.  UPI LITE X नियर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) सपोर्ट सोबत काम करतं. UPI LITE अन्य प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत अधिक फास्टही आहे.

युपीआय, युपीआय लाईटमध्ये फरक काययुपीआय लाईट हे पेमेंट सोल्यूशन आहे, जे छोट्या व्यवहारांसाठी काम करते. यामध्ये एनपीसीआय कॉमन लायब्ररी (सीएल) अॅपचा ​​वापर करण्यात आलाय. यामध्ये ५०० रुपयांपेक्षा कमी पैशांचं पेमेंट करता येतं. हे फीचर 'ऑन-डिव्हाइस वॉलेट' सारखं आहे. यात युझर्सना युपीआय पिन वापरून पेमेंट करण्याची सुविधा देतं.

कसं करतं कामUPI किंवा UPI Lite वापरून पैशांची देवाणघेवाण करता येते. युझरचा युपीआय आयडी किंवा लिंक केलेला फोन नंबर वापरून QR कोड स्कॅन करून हे व्यवहार पूर्ण केले जाऊ शकतात. दरम्यान, UPI Lite X व्यवहारांसाठी, युझर्सची डिव्हाईसेस एकमेंकांच्या जवळ असणं आवश्यक आहे. युपीआय व्यवहारादरम्यान, पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित हस्तांतरित केले जातात. पैसे युपीआय लाईट वरून ऑन-डिव्हाइस वॉलेट किंवा युपीआय लाईट खात्यावर पाठवले जातात.

किती रुपये करू शकता ट्रान्सफरयुपीआय बँक खात्यातून एका दिवसात जास्तीत जास्त २ लाख रुपये ट्रान्सफर केले जाऊ शकतात. UPI Lite ची कमाल मर्यादा ५०० रुपये आहे. तर एका दिवसात पैसे पाठवण्याची कमाल मर्यादा ४,००० रुपये आहे. पण UPI Lite X साठी अशी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

टॅग्स :पैसाबँक