Join us

यूपीआयने केला नवा रेकॉर्ड! मे महिन्यात १४ लाख कोटींचे व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 9:43 AM

‘एनपीसीआय’ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : सर्वसामान्यांनी पैशांच्या देवाणघेवाणीसाठी यूपीआयला पसंती दिली आहे. यूपीआयवरून झालेल्या व्यवहारांचा आकडा मे महिन्यात ९०० कोटींच्या पार गेला. याद्वारे १४.३ लाख कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७ टक्क्यांनी वाढले आहे. ‘एनपीसीआय’ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ३.९६ लाख रुपयांची देवाणघेवाण मे महिन्याच्या शेवटच्या १० दिवसांमध्येच झाली.

काय आहे यूपीआय?

  • भारतात वॉलेट सेवा देणारे प्रत्येक ॲॅप यूपीआयद्वारे देवाण-घेवाण करते. यूपीआयला आयएमपीएसच्या मॉडेलवर विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे यूपीआयवरून २४ तास व्यवहार केले जाऊ शकतात. 
  • ऑनलाइन व्यवहारापैकी ५०% व्यवहार वॉलेट ॲॅपवरून होतात. रिटेल पेमेंटमध्ये हे प्रमाण ८५ टक्के आहे. एका ॲॅप्लिकेशनमध्ये अनेक बँक खाती जोडता येऊ शकतात. 
  • पैसे पाठविण्यासाठी तुम्हाला प्राप्तकर्त्याचा केवळ मोबाइल क्रमांक, खाते क्रमांक अथवा यूपीआय आयडीची गरज असते.
टॅग्स :पैसा