Lokmat Money >बँकिंग > SBI एटीएम कार्डासोबत FREE मध्ये मिळतो २० लाख रुपयांचा विमा; कसा क्लेम कराल? 

SBI एटीएम कार्डासोबत FREE मध्ये मिळतो २० लाख रुपयांचा विमा; कसा क्लेम कराल? 

ATM कार्डसोबत तुम्हाला अपघाती विम्याची सुरक्षा मोफत दिली जाते. विम्याची रक्कम ही त्या त्या कार्डाच्या श्रेणीनुसार असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 04:15 PM2022-11-21T16:15:14+5:302022-11-21T16:16:37+5:30

ATM कार्डसोबत तुम्हाला अपघाती विम्याची सुरक्षा मोफत दिली जाते. विम्याची रक्कम ही त्या त्या कार्डाच्या श्रेणीनुसार असते.

upto 20 Lakh accidental insurance FREE with SBI ATM cards; How to claim? see process in Marathi | SBI एटीएम कार्डासोबत FREE मध्ये मिळतो २० लाख रुपयांचा विमा; कसा क्लेम कराल? 

SBI एटीएम कार्डासोबत FREE मध्ये मिळतो २० लाख रुपयांचा विमा; कसा क्लेम कराल? 

बँक खातेधारकांना मिळणाऱ्या एटीएम कार्डच्या मदतीने आपल्याला पैसे काढता येतात. ऑनलाईन शॉपिंग, बिलही भरता येते. परंतू तुम्हाला य़ाच एटीएमवर अपघाती विमा असतो हे माहितीय का? होय हा अपघाती विमा मोफत असतो. परंतू अनेकांना याची माहितीच नसल्याने ग्राहक या विम्याचा लाभच घेत नाहीत. पदरचे पैसे मोजून उपचार घेतले जातात, किंवा अपघाती मृत्यू झाल्यास वारसालाही याची माहिती नसल्याने त्याचेही नुकसान होते. 

ATM कार्डसोबत तुम्हाला अपघाती विम्याची सुरक्षा मोफत दिली जाते. विम्याची रक्कम ही त्या त्या कार्डाच्या श्रेणीनुसार असते. उदा. साठी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयची माहिती घेऊयात. एसबीआय़ त्यांच्या ग्राहकांना एटीएमवर २० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देते. 

एसबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, डेबिट कार्डधारकांना मोफत विमा संरक्षण मिळते. हे विमा संरक्षण 25 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंत असू शकते. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम ठरवली जाते. विम्याचा क्लेम करण्यासाठी फक्त एकच साधी अट आहे, अपघाताच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आधी एटीएम मशीन किंवा पीओएस/ईकॉमवर किमान एकदा एटीएम कार्ड वापरले गेले असावे लागेल. 

डेबिट कार्डधारकाचा अपघात आणि विमान अपघातात मृत्यू झाल्यास एटीएम कार्डवर उपलब्ध विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. डेबिट कार्ड वापरून विमानाचे तिकीट खरेदी केले असल्यास तुम्हाला विमान अपघातात विम्याचा दावा करता येतो. कार्डधारकाचा यात मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला याचा लाभ मिळतो. 

कसा कराल दावा...
एटीएम विम्याचा दावा करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागेल. कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास, डेबिट कार्डधारकाच्या नॉमिनीला बँकेच्या शाखेत जावे लागते. बँकेत जाऊन अर्ज द्यावा लागेल. आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. अपघाताच्या 45 दिवसांच्या आत कार्डधारकाला बँकेत जाऊन हा दावा करावा लागेल.

Web Title: upto 20 Lakh accidental insurance FREE with SBI ATM cards; How to claim? see process in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.