Lokmat Money >बँकिंग > डिसेंबरमध्ये उरका महत्त्वाची कामे; बँकांना १३ दिवस सुट्टी अन् बरंच काही

डिसेंबरमध्ये उरका महत्त्वाची कामे; बँकांना १३ दिवस सुट्टी अन् बरंच काही

भरावा लागेल मोठा आर्थिक दंड; दैनंदिन कामांशी संबंधितही काही गोष्टींमध्ये होणार बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:14 AM2022-11-29T11:14:57+5:302022-11-29T11:15:55+5:30

भरावा लागेल मोठा आर्थिक दंड; दैनंदिन कामांशी संबंधितही काही गोष्टींमध्ये होणार बदल

Urka important works in December; 13 days holiday for banks and many more | डिसेंबरमध्ये उरका महत्त्वाची कामे; बँकांना १३ दिवस सुट्टी अन् बरंच काही

डिसेंबरमध्ये उरका महत्त्वाची कामे; बँकांना १३ दिवस सुट्टी अन् बरंच काही

नवी दिल्ली : या वर्षाचा शेवटचा महिना याच आठवड्यात सुरू होईल. नववर्ष निश्चिंतपणे करण्यासाठी २०२२मधील करांशी संबंधित ४ कामे डिसेंबरमध्ये उरकून घ्यायला हवीत. विलंब शुल्कासह आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरणे, भरलेल्या आयटीआरमधील चुका दुरुस्त करणे, जीएसटी विवरणपत्र - ९ सी दाखल करणे आणि अग्रीम कराचा तिसरा हप्ता भरणे यांचा त्यामध्ये समावेश आहे.

कर सल्लागारांच्या मते, या चारपैकी एखादे काम जरी राहिले, तरी तुम्हाला दंड व अतिरिक्त व्याज द्यावे लागू शकते. शिवाय कायदेशीर नोटीसला उत्तरही देत बसावे लागेल ते वेगळेच. त्यामुळे लवकरात उरकायला हवी.

या गोष्टींकडे ठेवा लक्ष
१. विलंब शुल्काला आयटीआर २०२१-२२चे १ आयटीआर अजून भरलेले नाही, ते ३१ डिसेंबरपर्यं विलंब शुल्कासह भरू शकतात. ५ लाखांच्या आत उत्पन्न असल्यास १ हजार रुपये, तर ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास ५ हजार रुपये विलंब शुल्क त्यासाठी लागेल.

२. अग्रिम कराचा तिसरा हप्ता २०२२-२३चा | अग्रिम कर भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे. १० हजारांपेक्षा अधिक आयकर लागणाऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के कर आगाऊ भरावा लागतो. अन्यथा १ टक्का व्याज लागते.

३. आयटीआरमध्ये सुधारणा : २०२१-२२च्या आयटीआरमधील चुका दुरुस्त करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत सुधारित आयटीआर दाखल करता येते. त्यानंतर चुका सुधारण्याची संधी मिळणार नाही.

४. जीएसटीआर- ९ सी : जीएसटीआर- ९मध्ये काही सुधारणा करायची असल्यास जीएसटीआर- ९ सी दाखल करता येते. २०२१-२२चे जीएसटीआर-९ सी ३१ डिसेंबरपर्यंत दाखल करता येईल. त्यानंतर दररोज २०० रुपये विलंब शुल्क लागेल.

गॅस होऊ शकतो स्वस्त
डिसेंबरमध्ये जनसामान्यांना दिलासा देणारे काही बदल होऊ शकतात. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत यापूर्वी कपात करण्यात आली आहे. यावेळी डिसेंबरच्या सुरुवातीलाच स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

हयात प्रमाणपत्र लवकर द्या
निवृत्तीवेतनधारकांना हयात प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२२ ही अंतिम तारीख आहे. हयात प्रमाणपत्र न दिल्यास डिसेंबरमध्ये मिळणारी पेन्शन थांबू शकते.

बँकांना १३ दिवस सुट्टी
डिसेंबरमध्ये बँकांना १३ दिवस सुट्टी आहे. रविवारसह दुसरा व चौथा शनिवार तसेच नाताळ, वर्षाचा शेवटचा दिवस व गुरु गोविंदसिंह जयंती आदी सुट्ट्यांचा समावेश आहे.

ओटीपीशिवाय एटीएम देणार नाही पैसे
डिसेंबरमध्ये एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. त्याचा उपयोग करूनच पैसे काढता येतील.

Web Title: Urka important works in December; 13 days holiday for banks and many more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.