Join us  

SBI चं क्रेडिट कार्ड वापरताय? आता खिशाला लागणार कात्री, ‘या’ शुल्कात होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 6:05 PM

SBI Credit Card: तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड असल्यास तुमच्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका बसणार आहे.

SBI Credit Card: तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड (SBI Card) असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना आता मोठा झटका बसणार आहे. SBI ने क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट (Rent Payments) करण्यावर प्रोसेसिंग फी वाढवली आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना एक मेसेज पाठवला. त्यात क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्यासाठी 199 रुपये + कर भरावा लागणार असल्याचं स्पष्ट केलेय.

आतापर्यंत, ग्राहक क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्यासाठी 99 रुपये + कर भरत आहेत, परंतु आता ग्राहकांना 199 रुपये + कर भरावा लागणार आहे. SBI बँकेने केलेला हा नवा बदल 15 मार्च 2023 पासून लागू होईल. SBI ने नोव्हेंबर 2022 मध्ये यासाठी 99 रुपये + कर असे शुल्क लागू केले होते.

या बँकाही आकारतात शुल्कICICI बँक त्यांच्या क्रेडिट कार्ड धारकांकडून रेंट पेमेंटवर 1 टक्के प्रोसेसिंग शुल्क आकारते. बँक हे प्रोसेसिंग शुल्क 20 ऑक्टोबर 2022 पासून घेत आहे. एचडीएफसी बँक क्रेडिटद्वारे रेंट पेमेंट करण्यासाठी 500 रिवॉर्ड पॉइंट ऑफर करत आहे. पहिल्या महिन्यानंतर दुसऱ्यांदा रेंट कार्डाद्वारे भरल्यावर रेंटल पेमेंट ट्रान्झॅक्शन अमाऊंटवर 1 टक्के + कर शुल्क म्हणून आकारले जाते.  बँक ऑफ बडोदा 1 फेब्रुवारी 2023 पासून क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंटवर 1 टक्के शुल्क आकारत आहे. या बँकांव्यतिरिक्त, IDFC फर्स्ट बँक आणि कोटक बँक देखील 1 टक्के शुल्क आकारत आहेत.

टॅग्स :एसबीआय