देशात लाखो लोक पैशांच्या देवाणघेवाणीसाठी चेकचा वापर करतात. परंतु चेकद्वारे पेमेंट करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. बहुतेक वेळी लोक चेक आणि त्याद्वारे करण्यात येणाऱ्या पेमेंटबाबत संभ्रमावस्थेत असतात. बँकेचे चेक अनेक प्रकारचे असतात आणि निरनिराळ्या कामांसाठी त्याचा वापर केला जातो. तुम्ही कधी स्टेल आणि पोस्ट डेटेड चेकबद्दल ऐकलंय का. सामान्यत: या दोन चेकदरम्यानच्या अंतरावरून काही लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असतं. पाहूया काय आहे हे नक्की.
Post Dated Cheque
पोस्ट डेटेड चेक म्हणजे असा चेक जो काही दिवसांनंतरच्या तारखेसाठी दिला जातो. हा क्रॉस्ड पेयी किंवा अकाऊंट पेयी असतो. चेक कोणताही असो, तो त्यावर असलेल्या तारखेपासून पुढील ३ महिन्यांपर्यंत मान्य असतो.
पोस्ट डेटेड चेक अशा परिस्थितीत उत्तम ठरतो जेव्हा चेक जारी करताना तुमच्याकडे आवश्यक तितका निधी उपलब्ध नसेल. परंतु चेकवर दिलेल्या तारखेपर्यंत तुमच्याकडे मात्र फंड जमा असेल याची तुम्हाला खात्री असेल तेव्हाच हा चेक दिला जातो.
Stale Cheque
स्टेल चेक असे चेक असतात जे जारी केल्यानंतर पुढील ३ महिन्यांपर्यंत क्लिअर केलेले नसतात. असा स्थितीत ते एक्सपायर होतात. जेव्हा कोणतीही व्यक्ती चेकचा कालावधी संपल्यानंतर तो बँकेत देतो, तेव्हा बँक तो चेक क्लिअर करत नाही. एक्सपायर झालेल्या चेकला स्टेल चेक असं म्हटलं जातं.
Ante-dated Cheque
एंट डेटेड चेक, जो गेलेल्या तारखेला जारी केला जातो. जर अशा चेकमध्ये ३ महिन्यांची व्हॅलिडिटी शिल्लक असेल तरच तो क्लिअरींगसाठी दिला जाऊ शकतो. चेक जितका जुन्या तारखेचा असेल तितकी त्याची व्हॅलिडिटी संपण्याची शक्यता अधिक असते. कारण सामान्यपणे इश्यू केल्यानंतर चेकला ३ महिन्यांची व्हॅलिडिटी असते.