Join us  

Safest Banks Of India: देशाच्या सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने यादी जाहीर केली, पैसा बुडणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 10:16 AM

आरबीआय 2015 पासून अशा बँकांची यादी जाहीर करतेय. दरवर्षी ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँक बँकांना रेटिंग देते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह बँकांची नावे जाहीर केली आहेत. या बँक ग्राहक आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एवढ्या महत्वाच्या आहेत, की जर त्यांना जरा जरी काही झाले तरी त्याचा परिणाम अवघ्या देशाला भोगावा लागू शकतो. आरबीआयने एक सरकारी आणि दोन खासगी बँका देशातील सर्वात सुरक्षित बँका म्हटल्या आहेत. म्हणजेच तुमचे पैसे या बँकांमध्ये सुरक्षित असणार आहेत. 

 RBI ने डोमेस्टिक सिस्टमली इम्पॉर्टंट बँक्स (D-SIBs) 2022 ची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये एक सरकारी आणि दोन खाजगी क्षेत्रातील बँकांची नावे आहेत. 2022 च्या यादीत मागील वर्षी (2021) समाविष्ट असलेल्या बँकांची नावे देखील आहेत.

या यादीमध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI व्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील HDFC (HDFC) आणि ICICI बँक (ICICI) ची नावे आहेत. देशांतर्गत व्यवस्थात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या बँकांच्या या यादीमध्ये अशी नावे समाविष्ट आहेत, ज्यांचे बुडणे किंवा अपयश संपूर्ण आर्थिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकते. अशा बँकांवर आरबीआयची विशेष नजर असते. 

रिझर्व्ह बँक या बँकांवर कठोर प्रतिबंध उचलते. अशा बँकांना जोखीम भारित मालमत्तेचा काही भाग टियर-1 इक्विटी म्हणून ठेवणे आवश्यक असते. SBI ला त्यांच्या जोखीम भारित मालमत्तेपैकी 0.60 टक्के टियर-1 इक्विटी म्हणून ठेवावे लागते. तर तर HDFC आणि ICICI बँकेला त्यांच्या जोखीम भारित मालमत्तेच्या 0.20 टक्के हिस्सा राखीव ठेवावा लागतो. 

आरबीआय 2015 पासून अशा बँकांची यादी जाहीर करतेय. दरवर्षी ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँक बँकांना रेटिंग देते. या यादीत आतापर्यंत फक्त तीन बँकांचा समावेश करण्यात आला आहे. या अशा बँका असतात ज्यांना बुडण्यास देता येणार नाही, प्रसंगी केंद्र सरकारही त्यांना मदत करेल. 2015 आणि 2016 मध्ये, RBI ने या यादीत फक्त SBI आणि ICICI बँक समाविष्ट केली होती. यावरून लोबल रेटिंग एजेंसी मूडीजने सवालही उपस्थित केले होते. यानंतर २०१७ मध्ये एचडीएफसीचे नाव समाविष्ट करण्यात आले.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकएसबीआयएचडीएफसीआयसीआयसीआय बँक