लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ॲक्सिस बॅंकेने सिटी बॅंक आणि सिटीकाॅर्प फायनान्स इंडिया लिमिटेडच्या भारतातील ग्राहक व्यवसायाचे अधिग्रहण पूर्ण केले. एका आघाडीच्या बहुराष्ट्रीय बॅंकेने भारतातून गाशा गुंडाळला. मात्र, या अधिग्रहणामुळे ॲक्सिस बॅंकेचा क्रेडिट कार्डसह विविध बॅंकिंग व्यवसायात वाटा वाढला आहे. क्रेडिट कार्ड बाजारपेठेपुरते बाेलायचे झाल्यास भारतात बॅंकेचा वाटा सुमारे ५ टक्क्यांनी वाढला आहे.
भारतातील क्रेडिट कार्ड बाजारपेठ२०.९०%एचडीएफसी बॅंक
१९.६६%एसबीआय कार्ड
१६.५६%आयसीआयसीआय बॅंक
१६.२% ॲक्सिस बॅंक
ॲक्सिस बॅंकेला काय प्राप्त झाले?२४ लाख ग्राहक
१८ लाख क्रेडिट कार्डधारक
१८ लाखक्रेडिट कार्डधारक सिटी बॅंकेचे भारतात हाेते.
३९,९०० काेटी रुपयांच्या ठेवी
९४,७०० काेटी एयुएम
११.४ %वाटा ॲक्सिस बॅंकेचा क्रेडिट कार्ड बाजारपेठेत हाेता.
३,२०० कर्मचारी
अधिग्रहण ११,६०३ काेटी रुपयांमध्ये झाले आहे.