Join us  

UPI Charges News पेमेंटवर नेमके कुणाला चार्जेस लागणार?; अफवांवर विश्वास ठेवू नका, 'ही' महत्त्वाची माहिती वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 2:35 PM

२ हजारांच्या वरील ट्रान्झॅक्शनवर १.१ टक्के पीपीआय लावण्यात येणार असल्याची शिफारस केल्याचं वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. यावर एनसीपीआयनं आता स्पष्टीकरण दिलंय.

दोन दिवसांनी म्हणजेच १ एप्रिल २०२३ पासून नवीन आर्थिक वर्ष (New Financial Year) सुरू होणार आहे. यासोबतच नव्या आर्थिक वर्षात UPI व्यवहार देखील महाग होणार आहेत का? दरम्यान, २ हजारांच्या वरील ट्रान्झॅक्शनवर १.१ टक्के इंटरजेंच शुल्क लावण्यात येणार असल्याची शिफारस केल्याचं वृत्त मंगळवारी अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. यावर एनसीपीआयनं (NPCI) एका परिपत्रकाद्वारे आता स्पष्टीकरण दिलं आहे.

एनसीपीआयच्या परिपत्रकात काय?सीएनबीसी न्यूज १८ नं पहिल्यांदा रिपोर्ट केलेल्या एनसीपीआय सर्क्युलरनुसार प्रीपेड पेमेंड साधनांद्वारे केलेल्या युपीआय व्यवहारांवर आता १.१ टक्क्यांपर्यंत इंटरजेंच शुल्क आकारलं जाणार असल्याचं म्हटलं होत. हे शुल्क २ हजार रुपयांपेक्षा अधिक व्यवहारांवर तसंच UPI द्वारे वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यावर देखील लागू होणार असल्याचं म्हटलं होतं. (ट्वीट वाचा)

UPI द्वारे तुमच्या कुटुंबीयांना, अन्य व्यक्तींना करणाऱ्या पेमेंटवर परिणाम होणार का?तुमचे मित्र, कुटुंबीय किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती किंवा मर्चंटच्या बँक खात्यावर युपीआयद्वारे केलेल्या पेमेंटवर या इंटरजेंच शुल्काचा कोणताही परिणाम होणार नाही. पीयर टू पीयर आणि पीयर टू पीयर मर्चंट ट्रान्झॅक्शनवर या शुल्काचा परिणाम होणार नाही. तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय अगदी मोफत आपल्या बँक खात्यातून अन्य कोणत्याही व्यक्तीच्या किंवा मर्चंटच्या बँक खात्यात युपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवू शकता.

प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट म्हणजे काय?वॉलेट, प्रीलोडेड गिफ्ट कार्ड ही प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) आहेत. वॉलेटच्या काही उदाहरणांमध्ये पेटीएम वॉलेट, फोनपे वॉलेट, अॅमेझॉन पे, फ्रीचार्ज वॉलेट इत्यादींचा समावेश होतो.

युपीआयद्वारे पीपीआय पेमेंट म्हणजे काय?युपीआयच्या माध्यमातून पीपीआय पेमेंट करणं याचा अर्थ पेटीएम वॉलेटसारख्या माध्यमातून युपीआय क्युआर कोडद्वारे केलेला व्यवहार. उदाहरणार्थ, जर तुमच्या पेटीएम वॉलेटमध्ये पैसे असतील आणि तुम्हाला व्यापाऱ्याच्या युपीआय क्युआर कोडद्वारे पेमेंट करायचे असेल, तर २ हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या व्यवहारांवर १.१ टक्क्यांपर्यंत इंटरचेंज शुल्क आकारलं जाईल.

इंटरचेंज फी म्हणजे काय?इंटरजेंच शुल्क हे ते शुल्क आहे जे रिसिव्हर बँक पेमेंट सेवा प्रदात्याद्वारे व्यापाऱ्याकडून आकारली जाते.

कोण भरणार हे शुल्क?उदाहरणार्थ, जर तुम्ही दुकानामध्ये युपीआयद्वारे पीपीआय पेमेंट करत असाल आणि क्युआर कोड PhonePe चा असेल, तर फोन पे ला व्यापाऱ्याकडून लागू होणारे इंटरचेंज शुल्क मिळेल. हे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून युझरद्वारे केलेल्या पेमेंटसाठी व्यापाऱ्यांकडून शुल्क आकारलं जातं, तसंच हेदेखील आहे. यालाच मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणूनही ओळखलं जातं. या व्यवहारांसाठी युझरकडून शुल्क आकारलं जाणार नाही.

दरम्यान , जोपर्यंत वॉलेट सेवा देणारे या शुल्काचा बोजा ग्राहकांवर टाकणार नाहीत, तोपर्यंत युपीआयद्वारे वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याच्या बाबतीत, तुम्हाला कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही.

टॅग्स :पैसाबँक