तुम्हाला तुमचे बँक खाते, पॉलिसी किंवा डिमॅट खात्यासाठी केवायसी करायच असेल तर बँकेत जाण्याची गरज नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मोठा दिलासा दिला आहे. आता केवायसी प्रक्रिया घरी बसून पूर्ण करता येणार आहे. आता व्हिडीओ केवायसी (व्Video Customer Identification Process) सुविधेद्वारे ग्राहक हे काम कोणत्याही ठिकाणाहून सहज करू शकतात.
बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, शाखेत जाण्याव्यतिरिक्त, ‘नो युअर कस्टमर’ म्हणजेच केवायसी प्रक्रिया व्हिडीओच्या माध्यमातूनदेखील पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय, रिझर्व्ह बँकेने असेही म्हटले आहे की केवायसीमध्ये कोणताही बदल न झाल्यास केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण करण्यासाठी ग्राहकाचे 'सेल्फ डिक्लेरेशन' पुरेसे आहे.
बँकांना दिला सल्लाRBI ने सर्व बँकांना एक सल्लादेखील जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांना पुन्हा KYC पूर्ण करण्यासाठी बँकेने प्रदान केलेल्या विविध पर्यायांबद्दल माहिती देण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे म्हटले आहे. नवीन अधिसूचनेनुसार, ग्राहकांना नॉन-फेस-टू-फेस चॅनेलद्वारे सेल्फ डिक्लेरेशन देणे, बँकेच्या शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे किंवा V-CIP द्वारे रिमोट केवायसी पूर्ण करण्याचा पर्याय असेल.
तक्रारींनंतर दिलासाफोन कॉल्स आणि मेसेजद्वारे बँका सातत्याने ग्राहकांना संबंधित शाखेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरतात. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आरबीआयपर्यंत पोहोचत आहेत. ही अडचण कमी करण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेने नवीन सुविधा देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
ग्राहकांना करावे लागेल हे कामरिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की जर एखाद्या ग्राहकाला पुन्हा केवायसी करायचे असेल तर तो नोंदणीकृत ईमेल आयडी-मोबाइल नंबर, एटीएम, ऑनलाइन/इंटरनेट बँकिंग, मोबाइल अॅप वापरून शाखेत न जाता घरून किंवा कोणत्याही ठिकाणाहून त्याचे केवायसी करू शकतो. म्हणजेच या कामासाठी त्याला बँकेत फेऱ्या मारण्याची गरज नाही.दुसरीकडे, जर ग्राहकाला पत्ता अपडेट करायचा असेल तर तो त्याचा अपडेट केलेला पत्ता देऊ शकतो, जास्तीत जास्त दोन महिन्यांत बँकेद्वारे त्याची पडताळणी केली जाईल.