Lokmat Money >बँकिंग > बँक खाते आणि विमा उतरवताना नॉमिनी फॉर्म भरला का? एका चुकीमुळे कुटुंब येईल अडचणीत

बँक खाते आणि विमा उतरवताना नॉमिनी फॉर्म भरला का? एका चुकीमुळे कुटुंब येईल अडचणीत

Bank Account Nominee: तुमच्याही बँक खाते किंवा विमा पॉलिसीला नॉमिनी नसेल तर घाई करा. कारण, याचा पुढे कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:58 AM2024-09-11T11:58:57+5:302024-09-11T12:18:03+5:30

Bank Account Nominee: तुमच्याही बँक खाते किंवा विमा पॉलिसीला नॉमिनी नसेल तर घाई करा. कारण, याचा पुढे कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागेल.

why is a nominee necessary for a bank account and insurance | बँक खाते आणि विमा उतरवताना नॉमिनी फॉर्म भरला का? एका चुकीमुळे कुटुंब येईल अडचणीत

बँक खाते आणि विमा उतरवताना नॉमिनी फॉर्म भरला का? एका चुकीमुळे कुटुंब येईल अडचणीत

Bank Account Nominee:बँक खात्यात किंवा विमा पॉलिसीमध्ये नॉमिनी नसल्यास तुमच्या कुटुंबाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. आजच्या काळात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीचे बँक खाते आणि विमा पॉलिसी आहे. बँक खाते किंवा विमा पॉलिसी उतरवताना फॉर्ममध्ये नॉमिनीची माहितीही विचारली जाते. मात्र, काही लोक कोणतीही माहिती न देता हा कॉलम रिकामा ठेवतात. असे केल्याने बँक किंवा विमा कंपनीचे कोणतेही नुकसान होत नाही. परंतु, बँक किंवा विमा घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला भविष्यात अडचणी येऊ शकतात. तुम्हीही अद्याप नॉमिनी फॉर्म भरला नसेल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे.

अनेकांना बँक खाते किंवा विमा पॉलिसीतील नॉमिनीचे महत्त्व माहीत नाही. बँक आणि विमा या पैशाशी संबंधित बाबी आहेत. भविष्यात काही दुर्दैवी परिस्थितीत, बँकेच्या खातेदाराचा किंवा विमा धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला हे पैसे दिले जातात. मात्र, नॉमिनीचे नाव नसेल तर खातेदाराच्या मृत्यूनंतर, त्याच्या कायदेशीर वारसांना पैसे मिळवण्यासाठी लांब आणि कठीण कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल.

आई-वडील, मुले, पति-पत्नी किंवा भावंडांना नॉमिनी केले जाऊ शकते
तुम्ही तुमच्या बँक खात्यासाठी तुमचे आई-वडील, मुले, पती-पत्नी किंवा भावंडांपैकी कुणालाही तुमचा नॉमिनी बनवू शकता. तुमच्या मृत्यूनंतर, तुमच्या खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम तुमच्या नॉमिनीला सहजपणे दिली जाते. जर तुम्ही तुमच्या बँक खात्यासाठी कोणालाही नॉमिनी बनवले नसेल. तर अशा स्थितीत तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या बँक खात्यात जमा केलेली रक्कम फक्त तुमच्या कायदेशीर वारसांकडे जाते, ज्यामध्ये तुमची मुले आणि पती-पत्नी यांचा समावेश आहे. पण, ही प्रक्रिया वाटते तेव्हढी सोपी नाही. यासाठी बराच कालावधी लागतो. अशा वेळी तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे मृत्यूपश्चात तुमच्या कुटुंबाला गरजेच्या वेळी पैसे मिळू शकणार नाहीत. त्यांना अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

घरबसल्याही बनवता येईल नॉमिनी
जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी बनवले नसेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमच्या बँक खात्याला नॉमिनी करण्यासाठी नेट बँकिंग वापरू शकता. नेट बँकींगचा पर्याय उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन तुमच्या बँक खात्यासाठी नॉमिनी बनवू शकता.

Web Title: why is a nominee necessary for a bank account and insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.