Lokmat Money >बँकिंग > Personal Loan : का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित

Personal Loan : का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित

Personal Loan : कार आणि होम लोन कमी व्याजदराने मिळतं, पण पर्सनल लोनसाठी जास्त व्याज द्यावं लागतं, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. जाणून घेऊया कार आणि होम लोनच्या तुलनेत पर्सनल लोन का महाग आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:39 AM2024-10-24T10:39:44+5:302024-10-24T10:46:44+5:30

Personal Loan : कार आणि होम लोन कमी व्याजदराने मिळतं, पण पर्सनल लोनसाठी जास्त व्याज द्यावं लागतं, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. जाणून घेऊया कार आणि होम लोनच्या तुलनेत पर्सनल लोन का महाग आहे.

Why is Personal Loan expensive Why low interest on car and home loan know reason behind this | Personal Loan : का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित

Personal Loan : का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित

Personal Loan : प्रत्येकाला कधी ना कधी कर्जाची गरज भासतेच. कधी लोकांना पर्सनल लोनची (Personal Loan) गरज असते, तर कधी कार लोनची (Car Loan) गरज भासू शकते तर अनेकांना घर घेण्यासाठी होम लोनही (Home Loan) घ्यावं लागतं. कार आणि होम लोन कमी व्याजदराने मिळतं, पण पर्सनल लोनसाठी जास्त व्याज द्यावं लागतं, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. पर्सनल लोनसाठी तुम्हाला १०% ते २४% पर्यंत व्याज द्यावं लागेल. तर कार लोन किंवा होम लोन ८-९ टक्क्यांच्या दरम्यान मिळतं. जाणून घेऊया कार आणि होम लोनच्या तुलनेत पर्सनल लोन का महाग आहे.

का महाग असतं पर्सनल लोन?

पर्सनल लोन महाग असतात कारण ती कमी कालावधीसाठी दिली जातात. अशा प्रकारे बँकेला अल्प कालावधीसाठीच व्याज मिळतं. त्याचबरोबर पर्सनल लोनच्या बदल्यात अनेकदा काहीही गहाण ठेवलं जात नाही, त्यामुळे डिफॉल्टचा सामना करावा लागण्याच्या शक्यतेमुळेही त्याचा व्याजदर जास्त ठेवला जातो. आपला नफा वाचवण्यासाठी बँका पर्सनल लोनचे दर जास्त ठेवतात, जेणेकरून काही कर्जातून तोटा झाला तरी उर्वरित कर्जातून त्यांची भरपाई करता येऊ शकते.

होम लोन स्वस्त का?

गृहकर्ज स्वस्त होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सरकारच त्याला प्रोत्साहन देते. सर्व बँका आणि एनबीएफसींना नॅशनल हाऊसिंग बँकेकडून गृहकर्जासाठी पैसे दिले जातात. बँकांना हे कर्ज जवळपास २% आणि स्वस्त दरात मिळतं, त्यानंतर बँक तुम्हाला कर्ज देते.

दुसरीकडे गृहकर्ज दीर्घ मुदतीचे असेल तर बँकेला दीर्घ काळासाठी व्याज मिळतं. अशा वेळी कमी व्याजदर ठेवूनही बँकांना दीर्घ मुदतीत भरघोस उत्पन्न मिळतं. दुसरीकडे कर्ज घेऊन घर घेताना तुमचं घर हेच त्यांच्या कर्जाची गॅरंटी असते. जर तुम्ही कर्ज फेडू शकत नसाल तर बँक तुमचे घर विकून पैसे वसूल करेल.

सरकार का देतंय प्रोत्साहन?

सरकार गृहकर्जाला प्रोत्साहन देतं कारण यामुळे अर्थव्यवस्थेत बराच पैसा जातो आणि रोजगारही निर्माण होतो. घर विकत घेताना किंवा बांधताना त्या रजिस्ट्रेशनच्या वगैरेच्या माध्यमातून तुम्ही सरकारला चांगली रक्कम देता. त्याचबरोबर प्रत्येक घर बांधताना वीट, वाळू, खडी, बार, मजूर अशा सर्व गोष्टींना मागणी असते. घर बांधल्यानंतर ते सजवण्यासाठी लोखंड, लाकूड, रंग, फर्निचर आदींना मागणी असते. घर बांधताना अनेकांना रोजगार मिळतो. यामुळेच सरकार गृहकर्जाला प्रोत्साहन देते आणि म्हणूनच जास्तीत जास्त लोक गृहकर्ज घेतात यासाठी करसवलती उपलब्ध आहेत.

कार लोन स्वस्त का आहे?

गाडी खरेदी करताना जीएसटी, रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे भरतो. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेल भरताना तिथूनही कर सरकारकडे जातो. जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी सेवा किंवा कोणतीही दुरुस्ती, कोणताही भाग किंवा अॅक्सेसरीज घेता तेव्हा त्या सर्वांवर जीएसटी आकारला जातो, ज्यामुळे पैसे सरकारपर्यंत पोहोचतात. म्हणजे जितक्या जास्त गाड्या विकल्या जातील तितका जास्त पैसा सरकारपर्यंत पोहोचेल. अशावेळी सरकार कार लोनलाही प्रोत्साहन देते, त्यामुळे त्याचे व्याजदरही कमी ठेवले जातात.

Web Title: Why is Personal Loan expensive Why low interest on car and home loan know reason behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.