रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank Of India) पतधोरण समितीची आढावा बैठक (RBI MPC meeting) आजपासून सुरू झाली आहे. पतधोरण समितीची ही बैठक ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे. या बैठकीत रेपो दर, महागाई, जीडीपी वाढ आणि इतर आर्थिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. बैठक पूर्ण झाल्यानंतर, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास प्रमुख व्याजदरांबाबत घेतलेल्या निर्णयाची घोषणा करतील. रेपो रेटमध्ये वाढ किंवा त्यात कपात करण्याचा थेट परिणाम कर्ज आणि ठेवींच्या व्याजदरांवर होतो. रेपो दर वाढला की बँका कर्जाचे व्याजदर वाढवतात. तज्ज्ञांच्या मते, यावेळीही आरबीआय रेपो दर कायम ठेवू शकते.३ वेळा रेपो दर स्थिरसलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँक रेपो दरात कोणताही बदल करणार नाही अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीये. असं झाल्यास कर्जावरील व्याजदरावर कोणताही परिणाम होणार नाही. रेपो दरात बदल झाल्यावरच बँका कर्जाचे व्याजदर बदलतात. मात्र, महागाईबाबत सावध दृष्टिकोन अवलंबला जाऊ शकतो. पुढे अमेरिकेत व्याजदराबाबत कठोर कल येण्याचे संकेत आहेत. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती १० महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.कच्चं तेल महागलंसध्या डॉलरचा निर्देशांक मजबूत दिसून येत आहे. त्याचवेळी कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ होताना दिसतेय. मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमती ९० डॉलर्सवर पोहोचल्या. ब्रेंट ऑइल फ्युचर्स किमती प्रति बॅरल ९०.७७ डॉलर्सवर बंद झाल्या. दुसरीकडे, क्रूड ऑइल डब्ल्यूटीआय फ्यूचर्स प्रति बॅरल ८९.१४ डॉलर्सवर बंद झाले. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा महागाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आरबीआय एमपीसीच्या बैठकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.
EMI वाढणार की मिळणार दिलासा? सुरू झाली RBI MPCची बैठक, कच्च्या तेलानं वाढवलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 11:35 AM