Lokmat Money >बँकिंग > SBI मध्ये मोफत उघडू शकता Salary Account, फ्रीमध्ये मिळतील लाखो रुपयांचे फायदे

SBI मध्ये मोफत उघडू शकता Salary Account, फ्रीमध्ये मिळतील लाखो रुपयांचे फायदे

स्टेट बँकेत ग्राहकांना अनेक प्रकारचा लाभ मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 11:12 AM2023-08-17T11:12:30+5:302023-08-17T11:13:09+5:30

स्टेट बँकेत ग्राहकांना अनेक प्रकारचा लाभ मिळतो.

You can open a Salary Account in SBI for free you will get benefits of lakhs of rupees for free know details | SBI मध्ये मोफत उघडू शकता Salary Account, फ्रीमध्ये मिळतील लाखो रुपयांचे फायदे

SBI मध्ये मोफत उघडू शकता Salary Account, फ्रीमध्ये मिळतील लाखो रुपयांचे फायदे

SBI Salary Account Features:  तुम्हीही कुठेतरी नोकरी करत असाल आणि दर महिन्याला तुम्हाला पगार मिळतोय तर तुम्हाला देशातील सर्वात मोठी सरकारी बँकएसबीआयमध्ये अनेक अप्रतिम सुविधांचा लाभ मिळू शकतो. जवळपास सर्व बँका, मग त्या सरकारी असो वा खाजगी, पगारदार व्यक्तींना विशेष सुविधा देतात. स्टेट बँक ही त्यापैकीच एक आहे. परंतु या बँकेत ग्राहकांना अनेक सुविधांचा लाभ मिळतो.

सर्वप्रथम, एसबीआयच्या सॅलरी अकाऊंटबद्दल काही मूलभूत गोष्टी जाणून घेऊ. स्टेट बँक ऑफ इंडिया अनेक प्रकारची सॅलरी अकाऊंट ऑफर करते. सरकारी बँकेनं विविध प्रकारच्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांसाठी कस्टमाईज्ड सुविधांसह अनेक प्रकारच्या सॅलरी अकाऊंटचं पॅकेज तयार केलं आहे. एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या ९ प्रकारचे सॅलरी अकाउंट ऑफर केले जात आहेत.

हे आहेत ९ सॅलरी अकाऊंट

  • सेंट्रल गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज (CGSP)
  • स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज (SGSP)
  • रेल्वे सॅलरी पॅकेज (RSP)
  • डिफेन्स सॅलरी पॅकेज (DSP)
  • सेंट्रल आर्म्ड पोलीस सॅलरी पॅकेज (CAPSP)
  • पोलीस सॅलरी पॅकेज (PSP)
  • इंडियन कोस्ट गार्ड सॅलरी पॅकेज (ICGSP)
  • कॉरपोरेट सॅलरी पॅकेज (CSP)
  • स्टार्टअप सॅलरी पॅकेज (SUSP)


काय आहेत फायदे?

  • SBI ही देशातील सर्वात मोठी नेटवर्क बँक आहे. याचा अर्थ तुम्हाला SBI च्या सर्व सुविधा देशात कुठेही मिळू शकतात.
  • यासोबत तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. बॅलन्स नसतानाही तुम्ही 2 महिन्यांच्या पगाराइतके पैसे काढू शकता.
  • SBI तुम्हाला सॅलरी अकाऊंटसह डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड देखील देते. याशिवाय चेक ते डिजिटल बँकिंगचे सर्व फायदेही उपलब्ध आहेत.
  • तुमचे SBI मध्ये सॅलरी अकाऊंट असल्यास, तुम्हाला लॉकर सुविधेवर २५ टक्के सूट मिळेल.
  • सॅलरी अकाऊंटसह, SBI तुम्हाला डिमॅट खात्याची सुविधा देखील देते, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करू शकता.
  • सॅलरी अकाऊंट असलेल्या ग्राहकांना SBI कर्ज सहज आणि कमी व्याजावर मिळते. बँक लोन प्रोसेसिंग शुल्कावर ५० टक्के सूट देखील देते.
  • SBI त्यांच्या सॅलरी अकाऊंटच्या ग्राहकांसह विम्याचा लाभ देखील देते. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. तुमच्या पगारानुसार कव्हरेज ३० लाख रुपयांपर्यंत असू शकते.
  • SBI मध्ये सॅलरी अकाऊंट असल्यास, तुम्ही तुमच्या बँकेच्या एटीएममधून कितीही वेळा मोफत पैसे काढू शकता.
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसबीआयचे सॅलरी अकाउंट झिरो बॅलन्सवर देखील उघडता येते. शिल्लक शून्य झाल्यास तुम्हाला कोणतेहीशुल्क भरावे लागणार नाही.
  • जर तुमचा मासिक पगार २५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एसबीआयमध्ये खातेही उघडू शकता. अशा सॅलरी अकाऊंट ग्राहकांसाठी एसबीआय रिश्ते योजना खूप उपयुक्त आहे.


कोण उघडू शकतं खातं
कोणताही भारतीय नागरिक, जो नोकरी करत आहे आणि पगारातून दरमहा किमान १० हजार रुपये कमवत आहे, तो एसबीआय सॅलरी अकाऊंट उघडू शकतो. तुमची नोकरी सरकारी असो की खाजगी यानं काही फरक पडणार नाही. तुम्ही एसबीआय सॅलरी अकाऊंट ऑनलाइन देखील उघडू शकता, ज्यासाठी तुम्ही एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. मात्र, एकदा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी शाखेत जावे लागेल. त्याच वेळी, तुम्ही एसबीआयच्या तुमच्या जवळच्या शाखेत जाऊन थेट सॅलरी अकाऊंट उघडू शकता.

Web Title: You can open a Salary Account in SBI for free you will get benefits of lakhs of rupees for free know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.