Join us  

तुमचा फायदा : ग्राहकांचे नुकसान झाल्यास आता बँकांना धरणार जबाबदार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 9:28 AM

बँक लॉकरचे नवीन नियम नव्या वर्षापासून लागू होणार

नवी दिल्ली : नवीन वर्षात बँक लॉकरशी संबंधित नियम बदलणार आहेत. आरबीआयच्या सुधारित अधिसूचनेनुसार, १ जानेवारी २०२३ पासून नवीन नियम लागू झाल्यानंतर, बँका ग्राहकांना लॉकर्सबद्दल मनमानी करू शकणार नाहीत. याशिवाय कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा चोरी झाल्यास त्यांना जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. १ जानेवारीपर्यंत सध्याच्या ग्राहकांच्या लॉकर कराराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. बँक  लॉकर्ससाठी खासगी आणि सार्वजनिक बँकांमध्ये वेगवेगळे शुल्क आकारले जाते. खासगी बँकांमध्ये यासाठी अधिक शुल्क आहे.

नुकसानभरपाई द्यावी लागणारनवीन नियमांनुसार लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू बँकेच्या निष्काळजीपणामुळे खराब झाल्यास बँकेला त्याची भरपाई द्यावी लागेल. लॉकरच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था करणे ही बँकांची जबाबदारी आहे.

जबाबदारी झटकता येणार नाहीबँकांना हे स्पष्ट करावे लागेल की, त्यांनी केलेल्या करारामध्ये अशी कोणतीही अट समाविष्ट नाही की, ज्यामुळे ग्राहकांचे नुकसान होताना बँक आपली जबाबदारी झटकेल.

या नियमांत होणार बदलआरबीआयने सांगितले की, नव्या नियमांनुसार बँकांना रिकाम्या लॉकरची यादी व प्रतीक्षा यादी प्रदर्शित करणे आवश्यक असेल.लॉकर्ससाठी, बँका ग्राहकांकडून एकावेळी जास्तीत जास्त ३ वर्षांसाठी भाडे घेऊ शकतील. जर एखाद्या ग्राहकाचे नुकसान झाले तर बँक अटींचा हवाला देऊन जबाबदारीपासून वाचू शकत नाही.

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक