नवी दिल्लीः छोट्या छोट्या गुंतवणुकीसाठी लोकांचा पोस्टावर जास्त विश्वास आहे. पोस्टात पैसे गुंतवण्यालाही बरेच जण प्राधान्य देतात. पोस्टातल्या योजनेत गुंतवलेली छोटी छोटी रक्कम मोठा नफा मिळवून देते. विशेष म्हणजे पोस्टाची सुविधा आता आपल्याला ऑनलाइन पद्धतीनंही मिळते. परंतु पोस्टात गुंतवलेले पैशांपैकी ठरावीक रकमेहून अधिकचे रुपये काढल्यास आपल्याला TDS (Tax Deducted at Source) सुद्धा द्यावा लागणार आहे.
फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारनं एक नवी तरतूद केली आहे. ज्याअंतर्गत आपण 1 सप्टेंबर 2019नंतर खात्याच्या वित्त वर्ष 2019-20मध्ये 1 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम काढल्यास आपल्याला 2 टक्के टीडीएस देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तसेच खातेदाराचं पॅन कार्ड यंत्रणेत नोंदणीकृत आहे की नाही, हेसुद्धा पाहावं लागणार आहे.
नव्या तरतुदीनुसार कापणार टीडीएस
केंद्र सरकारनं प्राप्तिकर टॅक्स ऍक्ट 1961 (Income Tax Act, 1961)मध्ये फायनान्स ऍक्ट 2019अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे. वित्त वर्ष 2019-20मध्ये 1 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम काढल्यास 2 टक्के टीडीएस वसूल करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 1 सप्टेंबर 2019पासून हा नियम लागू करण्यात आला आहे.
CBDTनं दिलं स्पष्टीकरण
लोकांना गुंतवलेल्या पैशांतून चिंतामुक्त करण्यासाठी 194Nला 1 सप्टेंबर 2019ला हा नियम लागू करण्यात आला आहे. अशातच आपण 1 सप्टेंबर 2019नंतर खात्यातून 1 कोटी रुपये काढल्यास आपल्याला 2 टक्के TDS द्यावा लागणार आहे.
पोस्टातील खातेदारांसाठी मोठी बातमी, 'एवढी' रक्कम काढताना भरावा लागेल TDS
छोट्या छोट्या गुंतवणुकीसाठी लोकांचा पोस्टावर जास्त विश्वास आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:57 PM2020-01-13T13:57:06+5:302020-01-13T13:57:19+5:30