Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSNLच्या ग्राहकांसाठी खूशखबर! 'या' प्लॅनमध्ये आता सप्टेंबरपर्यंत मिळणार 300GB डेटा

BSNLच्या ग्राहकांसाठी खूशखबर! 'या' प्लॅनमध्ये आता सप्टेंबरपर्यंत मिळणार 300GB डेटा

बीएसएनएलच्या '300GB Plan CS337' या प्लॅनमध्ये 300 जीबी डेटा मर्यादेपर्यंत 40 एमबीपीएसचा स्पीड देण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 09:33 AM2020-06-05T09:33:28+5:302020-06-05T09:41:30+5:30

बीएसएनएलच्या '300GB Plan CS337' या प्लॅनमध्ये 300 जीबी डेटा मर्यादेपर्यंत 40 एमबीपीएसचा स्पीड देण्यात आला आहे.

Bsnl Extends 300gb Plan Cs337 Plan Till 9th September Know Details | BSNLच्या ग्राहकांसाठी खूशखबर! 'या' प्लॅनमध्ये आता सप्टेंबरपर्यंत मिळणार 300GB डेटा

BSNLच्या ग्राहकांसाठी खूशखबर! 'या' प्लॅनमध्ये आता सप्टेंबरपर्यंत मिळणार 300GB डेटा

Highlightsअसाच प्लॅन बीएसएनएल कंपनीकडून ओडिशामध्येही ऑफर करण्यात येत आहे. ओडिशामध्ये हा प्लॅन  'Bharat Fiber 300GB CUL CS346' च्या नावाने उपलब्ध आहे.  मासिक 600 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 300 जीबी डेटा 40 एमबीपीएसच्या स्पीडने देण्यात येत आहे.

नवी दिल्ली : बीएसएनएल (BSNL) ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. कंपनीने आपल्या 499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनची उपलब्धता 9 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनचे नाव  '300GB Plan CS337' आहे.  हा प्लॅन 10 जून रोजी संपणार होता, परंतु ग्राहकांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन कंपनीने या प्लॅनची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

बीएसएनएलच्या '300GB Plan CS337' या प्लॅनमध्ये 300 जीबी डेटा मर्यादेपर्यंत 40 एमबीपीएसचा स्पीड देण्यात आला आहे. मर्यादा संपल्यानंतर, हा स्पीड 1 एमबीपीएस पर्यंत कमी होईल. कंपनीचा हा प्लॅन कोलकाता, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल सर्कलमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंगची ऑफर देण्यात आली आहे.

असाच प्लॅन बीएसएनएल कंपनीकडून ओडिशामध्येही ऑफर करण्यात येत आहे. ओडिशामध्ये हा प्लॅन  'Bharat Fiber 300GB CUL CS346' च्या नावाने उपलब्ध आहे.  मासिक 600 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 300 जीबी डेटा 40 एमबीपीएसच्या स्पीडने देण्यात येत आहे. हा प्लॅन सध्या ओडिशामध्ये 27 जुलैपर्यंत ऑफर करण्यात येत आहे.

बीएसएनएलचा '300GB Plan CS337' प्लॅन जरी कोलकाता, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या तीन सर्कल पुरता मर्यादित असला, तरी कंपनीच्या 499 रुपयांचा प्लॅन देशातील अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे. या 499 रुपयांच्या स्टँडर्ड प्लॅनमध्ये 20 जीबीपीएसच्या स्पीडने 100 जीबी डेटा देण्यात येत आहे. कंपनीची ही योजना सध्या 29 जूनपर्यंत उपलब्ध आहे.

आणखी बातम्या...

पाकचं नापाक कृत्य, आयएसआय एजंटकडून भारतीय राजदूतांचा पाठलाग!

मीरारोडमध्ये दुहेरी हत्याकांड; बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या
 

Web Title: Bsnl Extends 300gb Plan Cs337 Plan Till 9th September Know Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.