नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर केलेला आहे. बजेटमधून भारतातल्या आरोग्य क्षेत्राला मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. 2025पर्यंत भारत टीबीमुक्त करणार असल्याचा निर्धार निर्मला सीतारामण यांनी बोलून दाखवला आहे. तसेच टीबी हारेगा, भारत जितेगा अभियान राबवणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली आहे. मिशन इंद्रधनुष योजनेचा विस्तार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत 20 हजार नवीन रुग्णालयं स्थापित करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. पीपीपी मॉडल अंतर्गत नवी रुग्णालयं तयार केली जाणार आहेत.
2022पर्यंत प्रत्येत जिल्ह्यात जनऔषध केंद्र स्थापन केलं जाणार आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आम्ही उघड्यावर शौचास जाणं पूर्णतः थांबवणार असल्याचंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं आहे. स्वच्छ भारतअंतर्गत 12300 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवलेला आहे. जल जीवन मिशनसाठी 3.6 लाख कोटी रुपये दिलेले आहेत. नवी रुग्णालयं निर्माण झाल्यानं मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचा विश्वास निर्मला सीतारामण यांनी व्यक्त केला आहे.
FM Nirmala Sitharaman: Viability gap funding window to be set up to cover hospitals, with priority given to aspirational districts that don't have hospitals empanelled under Ayushman Bharat scheme. #Budget2020https://t.co/MsiyQWNwZ3
— ANI (@ANI) February 1, 2020
देशातील गरजू नागरिकांना स्वस्त घरं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असून, महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश आलं आहे. बँकांची स्थिती मजबूत झाली, 60 लाख नवे करदाते तयार झालेत. आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर केंद्र सरकारनं भर दिलेला आहे. आर्थिक प्रकरणात महसूल, खर्च, वित्तीय सेवा, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन या विभागांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. बजेट तयार करण्यासाठी या संबंधित विभागांचे अधिकारी, सचिव आणि त्याचबरोबर मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) आणि सरकारचे प्रधान आर्थिक सल्लागार (पीईए) यांचं विशेष योगदान असतं.
FM Nirmala Sitharaman: There is a shortage of qualified medical doctors both general practitioners and specialists; it is proposed to attach a medical college to a district hospital in PPP mode; details of the scheme to be worked out soon. #Budget2020pic.twitter.com/aHQXn0yAgs
— ANI (@ANI) February 1, 2020
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा
Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता
Budget 2020 : महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश- निर्मला सीतारामण
Budget 2020: अर्थसंकल्प सादर होत असताना मोदी सरकारसाठी मोठी खूशखबर