नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. करदात्यांच्या कररचनेत बदल करण्यात आलेला आहे. पाच ते साडेसात लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना फक्त 10 टक्के कर आकारला जाणार आहेत. 5 ते 7.5 लाखदरम्यान करपात्र उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के कर वसूल केला जाणार आहे. तर 7.50 ते 10 लाखांसाठी 15 टक्के कर आकारला जाणार आहे. तसेच 10 ते 12.5 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांकडून 20 टक्के कर आकारला जाणार आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12.5 ते 15 लाख आहे, त्यांच्याकडून 25 टक्के कर आकारला जाणार आहे. वार्षिक उत्पन्न 15 लाखांहून अधिक असणाऱ्यांकडून 30 टक्के प्राप्तिकर आकारला जाणार आहे.
या कररचनेत बदल करण्यात आलेला असून, वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये असणाऱ्यांना करमुक्त करण्यात आलं. त्यांना करातून सूट देण्यात आली आहे. तत्पूर्वी ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांच्याकडून कोणताही कर वसूल केला जात नव्हता. तसेच 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत एकूण वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांकडून 5 टक्के कर आकारला जात होता.
Finance Minister Nirmala Sitharaman: A person earning Rs 15 lakh per annum and not availing any deductions will now pay Rs 1.95 lakh tax in place of Rs 2.73 lakh https://t.co/5kATL4iF5l
— ANI (@ANI) February 1, 2020
तर 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांकडून 20 टक्के प्राप्तिकर आकारला जात होता. वर्षाला 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांकडून 30 टक्के कर आकारला जात होता. विमा हप्ता, पीएफमधलं योगदान, मुलांच्या शाळेची फी, घरावरील कर्ज, पीपीएफमधलं योगदान ही सर्व गुंतवणूक कलम 80 सीअंतर्गत येते. एवढ्या सर्व गुंतवणुकीवर दीड लाखापर्यंत करातून सूट मिळते.
FM Nirmala Sitharaman: In this new personal income tax regime, income tax rates will be significantly reduced for the individuals who forgo certain exemptions and deductions https://t.co/5kATL4iF5l
— ANI (@ANI) February 1, 2020
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा
Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता
Budget 2020 : महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश- निर्मला सीतारामण
Budget 2020: अर्थसंकल्प सादर होत असताना मोदी सरकारसाठी मोठी खूशखबर