Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2021: देशात पहिल्यांदाच स्थापन होऊ शकते 'बॅड बँक'; अर्थमंत्री महत्त्वाची घोषणा करणार?

Budget 2021: देशात पहिल्यांदाच स्थापन होऊ शकते 'बॅड बँक'; अर्थमंत्री महत्त्वाची घोषणा करणार?

Budget 2021 Banking Sector Latest News and updates: अर्थमंत्री सीतारामन बँकिंग क्षेत्राला दिलासा देण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 11:33 AM2021-02-01T11:33:05+5:302021-02-01T11:48:40+5:30

Budget 2021 Banking Sector Latest News and updates: अर्थमंत्री सीतारामन बँकिंग क्षेत्राला दिलासा देण्याची शक्यता

Budget 2021 FM nirmala sitharaman likely to make announcement about bad bank to revive banking sector | Budget 2021: देशात पहिल्यांदाच स्थापन होऊ शकते 'बॅड बँक'; अर्थमंत्री महत्त्वाची घोषणा करणार?

Budget 2021: देशात पहिल्यांदाच स्थापन होऊ शकते 'बॅड बँक'; अर्थमंत्री महत्त्वाची घोषणा करणार?

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना संकट, त्यापाठोपाठ करावा लागलेला लॉकडाऊन याचा थेट फटका अर्थव्यवस्थेला बसला. कोरोना काळात उद्योगधंदे होते. त्यामुळे सरकारला मिळणारा महसूल आटला. मात्र त्याचवेळी आरोग्य व्यवस्थेवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला दिलासा देण्याचं मोठं आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. 

बँकिंग क्षेत्राला दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री त्यांच्या अर्थसंकल्पात बॅड बँक (Bad Bank) तयार करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या प्रकारची संकल्पना आधीही पुढे आली होती. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात यासंदर्भात मोठी घोषणा होऊ शकते. तसे संकेत मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिले. बॅड बँकच्या संकल्पनेच्या काही सकारात्मक बाजू आहेत. बॅड बँक तयार करताना सावध राहण्याची गरज आहे. बॅड बँकेची स्थापना खासगी क्षेत्राच्या नेतृत्त्वाखाली व्हावी. त्यामुळे उत्पादकता वाढेल, असं सुब्रमण्यम म्हणाले होते.

Budget 2021 : काय होणार स्वस्त? काय महागणार? जाणून घ्या...

बॅड बँकेच्या स्थापनेमुळे एनपीएचं एकीककरण होण्यास मदत होईल, असं सुब्रमण्यम यांनी सांगितलं. बॅड बँक ही संकल्पना खासगी क्षेत्रात Budget 2021 Banking Sector राबवली जाण्याबद्दल विचार व्हावा. त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक वेगानं होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सर्व व्यवसायिक बँकांचा जीएनपीए (ग्रॉस नॉन पर्फॉर्मिंग असेट्स) रेशियो ७.५ टक्क्यांवरून १३.५ टक्क्यांवर जाईल, अशी शक्यता आरबीआयनं सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ च्या अहवालात व्यक्त केली. सूक्ष्म आर्थिक वातावरण आणखी बिघडल्यास, त्यावर अधिक दबाव आल्यास जीएनपीए १४.८ टक्क्यांवर जाऊ शकतो.

बजेटच्या दिवसाची सुरुवात गोड; सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला

बॅड बँक म्हणजे काय? 
बॅड बँक एक आर्थिक संस्था असते. बँकांचं बुडित खात्यात गेलेलं कर्ज स्वीकारून त्यातून मार्ग काढण्याची प्रक्रिया या संस्थेकडून पूर्ण केली जाते. बँका बऱ्याच कालावधीपासून बॅड बॅकेसारखी संस्था स्थापन करण्याची मागणी करत होत्या. ज्यामुळे त्यांच्यावरील बुडालेल्या कर्जाचा दबाव कमी होऊ शकतो. या प्रकारच्या बँका जगभरात कार्यरत आहेत. फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोर्तुगालमध्ये अनेक वर्षांपासून बॅड बँका काम करत आहेत. खराब मालमत्तांचं रुपांतर चांगल्या मालमत्तांमध्ये करण्याची जबाबदारी या बँकांवर असते.

Web Title: Budget 2021 FM nirmala sitharaman likely to make announcement about bad bank to revive banking sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.