Budget 2021 : देशाचा अर्थसंकल्प आज संसदेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात चांगलं वातावरण पाहायला मिळत आहे. बाजार उघडाच सेन्सेक्सने ( Sensex ) ४४३ अंकांची उसळी घेतली आहे. तर निफ्टीनंही ( nifty ) ११४ अंकाची वाढ नोंदवली आहे.
बजेटच्या दिवशी सोन्याचा भाव काय? जाणून घ्या लेटेस्ट दर
शेअर बाजाराचे व्यवहार सुरु होताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ४४३ अंकांच्या वाढीसह ४६,७२८ अंकांसह सुरू झाला आहे. तर निफ्टी ११४.८५ अंकांच्या वाढीसह १३,७४९.४५ वर उघडला आहे.
३० लाख कोटींचा आहे भारताचा अर्थसंकल्प; जाणून घ्या कुठून येतो इतका पैसा?
दरम्यान, शुक्रवारी 'बीएसई'च्या ३० शेअरवर आधारित प्रमुख सेन्सेक्स २,५९२.७७ अंक म्हणजेच ५.३० टक्क्यांनी घसरून ४५,२८५.७७ वर बंद झाला होता. तर 'एनएसई'च्या ५० शेअरवर आधारित प्रमुख निफ्टीही मागच्या आठवड्याच्या तुलनेत ७३७.३० अंकांनी म्हणजेच ५.१३ टक्क्यांनी घसरून १३,६३४.६० वर बंद झाला. या महिन्यात ऐतिहासिक उच्चांकापर्यंत पोहोचल्यानंतर सेन्सेक्स जवळपास ४,००० अंकांनी कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर निफ्टीत १,००० अंकांची घसरण झाली होती.