Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2024: ₹१ लाखांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन, होम लोनवर अधिक सूट; अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठ्या घोषणा

Budget 2024: ₹१ लाखांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन, होम लोनवर अधिक सूट; अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठ्या घोषणा

Budget 2024-25: अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून कर्मचारी वर्गासह सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. पाहूया काय म्हणताहेत तज्ज्ञ.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:48 AM2024-07-15T10:48:39+5:302024-07-15T10:50:27+5:30

Budget 2024-25: अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून कर्मचारी वर्गासह सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. पाहूया काय म्हणताहेत तज्ज्ञ.

Budget 2024 Standard deduction up to rs 1 lakh more discount on home loans Big announcements can be made in the budget nirmala sitharaman | Budget 2024: ₹१ लाखांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन, होम लोनवर अधिक सूट; अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठ्या घोषणा

Budget 2024: ₹१ लाखांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन, होम लोनवर अधिक सूट; अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठ्या घोषणा

Budget 2024-25: अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून कर्मचारी वर्गासह सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, २०२४-२५ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शन (Standard Deduction) दुप्पट करून एक लाख केलं जाऊ शकते, अशी आशा सल्लागार कंपनी केपीएमजीनं व्यक्त केलीये. याशिवाय गृहकर्जावरील व्याजावरील करसवलतीतही वाढ होण्याची शक्यता असून गॅपिटल गेन टॅक्सही तर्कसंगत केला जाण्याची अपेक्षा वर्तवण्यात आलीये. 'वैद्यकीय खर्च, इंधन खर्च आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वैयक्तिक खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यानुसार स्टँडर्ड डिडक्शन सध्याच्या ५० हजार रुपयांवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे,' असं केपीएमजीनं एका नोटमध्ये म्हटलंय.

ग्राहकांच्या हातात अधिकाधिक पैसा ठेवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, असं सल्लागार कंपनीनं म्हटलंय. नव्या कर प्रणालीअंतर्गत सरकार करसवलतीची मर्यादा तीन लाखरुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

होम लोन संदर्भात काय म्हटलं?

'व्याजदरात झालेली वाढ आणि नियामक सुधारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रावर दबाव वाढत आहे. ही आव्हानं कमी करण्यासाठी आणि घर खरेदीला चालना देण्यासाठी सरकार नवीन कर प्रणालीअंतर्गत सेल्फ ऑक्युपेन्सी होम लोनवरील व्याजासाठी वजावट देण्याचा विचार करू शकते किंवा जुन्या कर प्रणालीतून वजावट कमीतकमी ३ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा विचार करू शकते,' असंही त्यांनी आपल्या नोटमध्ये म्हटलंय.

Web Title: Budget 2024 Standard deduction up to rs 1 lakh more discount on home loans Big announcements can be made in the budget nirmala sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.