Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी

Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी

Noel Tata News: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाचं टाटा समूहाशी खास नातं आहे. टाटा समूहाच्या २ कंपन्या याच्याशी जोडल्या गेल्यात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 09:59 AM2024-10-12T09:59:53+5:302024-10-12T10:04:38+5:30

Noel Tata News: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाचं टाटा समूहाशी खास नातं आहे. टाटा समूहाच्या २ कंपन्या याच्याशी जोडल्या गेल्यात. 

Burj Khalifa having taat connection Noel Tata chairman of Tata Trust having connection with those companies tata steel tata trent share price | Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी

Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी

Ratan Tata Successor Noel Tata : नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा यांचं बुधवारी रात्री उशिरा वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. टाटा ट्रस्टच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोएल यांच्याकडे टाटा समूहातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की, जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाचं टाटा समूहाशी खास नातं आहे. एवढंच नाही तर ही जबाबदारी नोएल टाटा यांच्यावर आहे.

दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. ही इमारत थंड ठेवण्यासाठी यात एसीची यंत्रणा आहे. या इमारतीतील वातानुकूलन यंत्रणा व्होल्टास कंपनीची आहे. व्होल्टासची १३ हजार टन वजनाची वातानुकूलित यंत्रणा येथे बसविण्यात आली आहे. तर, बुर्ज खलिफाच्या बांधकामात जे स्टील वापरण्यात आलंय त्यातील ३९ हजार टन स्टील टाटा स्टीलनं दिलं आहे. व्होल्टास कंपनी आणि टाटा स्टील या दोन्ही टाटा समूहाच्या कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांची जबाबदारी नोएल टाटा यांच्याकडे आहे. नोएल हे टाटा व्होल्टासचे चेअरमन आणि टाटा स्टीलचे व्हाइस चेअरमन आहेत.

काय करते व्होल्टास?

टाटा समूहाची ही कंपनी मल्टीनॅशनल होम अप्लायन्सेस कंपनी आहे. याचं मुख्यालय मुंबईत आहे. ही कंपनी एअर कंडिशनर, कुलर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन आदींची निर्मिती करते. ही कंपनी १९५४ मध्ये सुरू झाली. या कंपनीची उत्पादनं जगभरात विकली जातात. 

केव्हा जोडले गेले नोएल टाटा?
नोएल टाटा यांनी आपल्या करिअरची सुरुवात टाटा इंटरनॅशनलमधून केली होती. जून १९९९ मध्ये ते समूहाची रिटेल ब्रान्च ट्रेंटचे व्यवस्थापकीय संचालक झाले. त्याची स्थापना त्यांच्या आईनंच केली होती. नंतर ट्रेंटनं लिटलवूड्स इंटरनॅशनल हे डिपार्टमेंटल स्टोअर विकत घेतलं आणि त्याचं नाव वेस्टसाइड असं बदललं. नोएल टाटा यांची २००३ मध्ये व्होल्टासच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Web Title: Burj Khalifa having taat connection Noel Tata chairman of Tata Trust having connection with those companies tata steel tata trent share price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.