आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अनेकदा ते पूर्ण करता येत नाही. बहुतांश लोक होम लोनच्या माध्यमातून घर विकत घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करतात. इतकंच काय तर घर खरेदीनंतरही अनेक कामांसाठी पैशांची गरज भासू शकते. अशावेळी आणखी एखाद होम लोन घ्यावं असा विचार अनेकांच्या मनात येतो. पाहूया एक होम लोन असताना दुसरं होम लोन घेता येतं का?
एक होम लोन घेतल्यानंतर दुसरं होन लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला टॉप अप लोन (Top up Home Loan) घेता येऊ शकतं. होम लोन घेतल्यानंतर हे लोन घेता येतं. यामध्येही व्याजदर कमी असतात. पाहूया काय असतं टॉप अप लोन.
टॉप-अप होम लोन (Top up Home Loan)
होम लोन वर काम चालत नसेल तर टॉप-अप होम लोन घेऊ शकता. टॉप-अप होम लोनमध्ये ही तुम्हाला अनेक चांगल्या डील्स मिळतात. जर एखाद्या ग्राहकानं आपल्या कर्जाचा १२ महिन्यांचा ईएमआय स्किप न करता भरला तर तो टॉप-अप होम लोनचा पर्याय निवडू शकतो. टॉप-अप होम लोनच्या कालावधीबद्दल बोलायचं झाले तर या कर्जाचा कालावधी वेगवेगळ्या बँकांनुसार वेगवेगळा असतो. नॉर्मल होम लोन आणि टॉप-अप होम लोनच्या व्याजदरात १ ते २ टक्क्यांची तफावत असू शकते. टॉप-अप होम लोनचा व्याजदर सामान्य होम लोनपेक्षा जास्त असतो.