Lokmat Money > बिझनेस न्यूज > Car Insurance : पावसाळ्यात कार पाण्यात बुडल्यानंतर इन्शुरन्स मिळतो का? जाणून घ्या काय आहे नियम

Car Insurance : पावसाळ्यात कार पाण्यात बुडल्यानंतर इन्शुरन्स मिळतो का? जाणून घ्या काय आहे नियम

Car Insurance : देशात मान्सून सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे, पावसाळ्यात कार, वाहने पाण्यात बुडतात. यामुळे मोठं नुकसान होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 05:47 PM2024-07-01T17:47:17+5:302024-07-01T17:49:21+5:30

Car Insurance : देशात मान्सून सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे, पावसाळ्यात कार, वाहने पाण्यात बुडतात. यामुळे मोठं नुकसान होतं.

Car Insurance Is insurance available after a car gets submerged in water during monsoon? Know what the rules are | Car Insurance : पावसाळ्यात कार पाण्यात बुडल्यानंतर इन्शुरन्स मिळतो का? जाणून घ्या काय आहे नियम

Car Insurance : पावसाळ्यात कार पाण्यात बुडल्यानंतर इन्शुरन्स मिळतो का? जाणून घ्या काय आहे नियम

Car Insurance : देशात मान्सूनला सुरुवात झाली आहे. मान्सूनमध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती येते. पावसाळ्यात शहरांपासून खेड्यापर्यंत अनेक ठिकाणी पाणी साचते, या पाण्यात अनेक गाड्यांचे नुकसान होते. कधी कधी मुसळधार पावसामुळे गाड्या वाहून जातात. नैसर्गिक आपत्तीमुळे वाहनांचे नुकसान होते.  याची भरपाई किंवा इन्शुरन्स मिळतो का? याबाबत अनेकांच्यात चर्चा असते.

पैसे तयार ठेवा! 'ही' हेल्थ इन्शूरन्स कंपनी ₹३००० कोटींचा IPO आणणार, जाणून घ्या

पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने गाड्यांना अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. जर तुमच्या कारमध्ये पाणी शिरले तर त्याचे इंजिन खराब होऊ शकते. त्याची दुरुस्ती करण्यासाठी खूप खर्च येऊ शकतो. अनेक प्रकरणांमध्ये हा खर्च एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यासोबतच विद्युत यंत्रणा आणि उपकरणेही खराब होऊ शकतात. त्यांच्या दुरुस्तीसाठीही मोठा खर्च असतो. 

जर तुमच्याकडे कार इन्शुरन्स असेल तर तुम्ही अशा सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता. नैसर्गिक आपत्ती, अपघात, चोरी इत्यादींसाठी सर्वसमावेशक विमा पॉलिसी अधिक फायदेशीर आहे. यामध्ये, खराब हवामानामुळे वाहनाचे झालेले नुकसान दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी कव्हर मिळते.  ही पॉलिसी ऑप्शनल आहे. जर तुम्ही सर्वसमावेशक विमा पॉलिसी घेतली असेल, तर तुम्ही पूर, आग, चोरी यामुळे झालेल्या सर्व नुकसानीवर क्लेम करू शकता. याचे कारण सर्वसमावेशक धोरणात पूर किंवा पाण्यामुळे होणारे सर्व प्रकारच्या नुकसानीचा समावेश आहे. 

इन्शुरन्स घेताना या गोष्टींची काळजी घ्या

आपण इन्शुरन्स घेताना अनेक गोष्टींचा विचार करत नाही. पण, तुम्ही इन्शुरन्स घेताना सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहायला हव्या. आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे वाहनांचा इन्शुरन्य घ्यायला हवा. पावसानंतर पूरसदृश परिस्थिती उद्भवल्यास अशा परिस्थितीत सर्वसमावेशक विमा पॉलिसी घेणे चांगले. हे इन्शुरन्स घेत असताना स्टॅन्डर्ड कॉम्प्रेसिव्ह पॉलिसीसह झिरो डेप्रिशिएशन आणि इंजिन प्रोटेक्शन कव्हर सारखे अॅड ऑन कव्हर घ्यायला हवे. कारण स्टँडअलोन पॉलिसीमध्ये पाण्यामुळे इंजिनचे झालेले नुकसान कव्हर केले जात नाही. म्हणूनच, जर तुम्ही इंजिनच्या बिघाडासाठी ॲड-ऑन कव्हर घेतले असेल, तर तुम्ही कंपनीकडे पूर्ण क्लेम करू शकता.

Web Title: Car Insurance Is insurance available after a car gets submerged in water during monsoon? Know what the rules are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.