नवी दिल्ली: आताच्या घडीला शेअर मार्केटची विक्रमा घोडदौड सुरू असल्याचे दिसत आहे. मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीने नवीन उच्चांक गाठला आहे. ऑगस्ट महिना गुंतवणूकदारांसाठी पर्वणीचा ठरत असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या आठवड्यात एकाच दिवशी चार IPO आल्यानंतर आता देशामधल्या सिमेंट क्षेत्रातील पाचवी मोठी कंपनी तब्बल ५ हजार कोटींचा आयपीओ सादर करत आहे. (cement company nuvoco vistas to raise 5000 crore through ipo issue)
नूवोको विस्तास कॉर्पोरेशन लिमिटेड असे या कंपनीचे नाव असून, क्षमतेच्या बाबतीत पूर्व भारतामधील सर्वात मोठी सिमेंट कंपनी मानली जाते. नूवोको विस्तासने IPO योजना जाहीर केली आहे. सोमवार ९ ऑगस्ट २०२१ रोजी खुली होत असून, बुधवार ११ ऑगस्ट २०२१ रोजी बंद होईल. यासाठी प्रती शेअर ५६० ते ५७० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.
भन्नाट संधी! Amul ची फ्रेंचायझी घ्या अन् २ लाखांच्या गुंतवणुकीवर १० लाखांचा नफा मिळवा
कंपनीकडून ५ हजार कोटींचा एकूण प्रस्ताव
नूवोको विस्तास कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतामधील एक अग्रगण्य रेडी मिक्स कॉंन्क्रीट निर्मातादारही आहे. कंपनीकडून ५ हजार कोटींचा एकूण प्रस्ताव असून इक्विटी शेअरच्या नवीन इश्यूत सरासरी १ हजार ५०० कोटी आणि नियोगी एन्टरप्राईज प्रायव्हेट लिमिटेड द्वारे इक्विटी शेअर विक्री प्रस्ताव सरासरी ३ हजार ५०० कोटींचा आहे. नवीन इश्यूमधून कंपनी १ हजार ३५० कोटी उभारणार आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय! कंपन्यांचे तब्बल ८ हजार १०० कोटी परत करणार; करविवाद संपणार?
दरम्यान, ३१ मार्च २०२१ रोजी कंपनीकडे ११ सिमेंट प्रकल्प आहेत. त्यांची एकत्रित स्थापित निर्मिती क्षमता २२.३२ एमएमटीपीए आहे. कंपनीच्या नेतृत्व टीमची जबाबदारी चेअरमन व नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हिरेन पटेल आणि मॅनेजिंग डायरेक्टर जयकुमार कृष्णास्वामी यांच्याकडे आहे.