Lokmat Money > बिझनेस न्यूज > CoronaVirus: कोरोनाचा कहर! भारताच्या मदतीला अमेरिकेच्या कंपन्या; ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना 

CoronaVirus: कोरोनाचा कहर! भारताच्या मदतीला अमेरिकेच्या कंपन्या; ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना 

CoronaVirus: भारताची मदत करण्यासाठी अमेरिकेच्या ४० कंपन्या सरसावल्या असून, ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 02:50 PM2021-04-27T14:50:12+5:302021-04-27T14:52:33+5:30

CoronaVirus: भारताची मदत करण्यासाठी अमेरिकेच्या ४० कंपन्या सरसावल्या असून, ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती मिळाली आहे.

coronavirus 40 american companies ceo form task force to help india in corona situation | CoronaVirus: कोरोनाचा कहर! भारताच्या मदतीला अमेरिकेच्या कंपन्या; ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना 

CoronaVirus: कोरोनाचा कहर! भारताच्या मदतीला अमेरिकेच्या कंपन्या; ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना 

Highlightsभारताच्या मदतीसाठी ४० कंपन्यांच्या प्रमुखांचा मदतीसाठी पुढाकारनिवडक उद्योजकांची टास्क फोर्स तयारजो बायडन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील सकारात्मक चर्चेवर समाधान

नवी दिल्ली: गेल्या काही सलग दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठताना दिसत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही वाढ होत आहे. ऑक्सिजन, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांची कमतरता जाणवू लागली आहे. संपूर्ण देशात बिकट, भयावह आणि गंभीर परिस्थिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर भारताची मदत करण्यासाठी अमेरिकेच्या ४० कंपन्या सरसावल्या असून, ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती मिळाली आहे. (coronavirus 40 american companies ceo form task force to help india in corona situation)

ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर, बेड, औषधे या स्वरूपात इतर देशांतून मदत केली जात आहे. भारतातील करोना संकटाला थोपवण्यासाठी आता अमेरिकेतील ४० कंपन्यांच्या सीईओने पुढाकार घेतला आहे.  या सीईओंनी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या माध्यमातून भारताला आवश्यक साधनसामुग्रीची मदत केली जाणार आहे. अलीकडेच गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे उद्योजक सुंदर पिचाई यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली. तर दुसरीकडे मायकोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 

आताची स्थिती नॅशनल इमरजन्सी नाही का? लसींच्या किमतीवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकाले

४० कंपन्यांच्या प्रमुखांचा मदतीसाठी पुढाकार

अमेरिकेतील आघाडीच्या ४० कंपन्यांचे प्रमुख भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या संदर्भात यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल आणि यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशीप फोरमची बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये शक्य तितक्या लवकर भारताला ४० हजार ऑक्सिजन मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

निवडक उद्योजकांची टास्क फोर्स तयार

भारतात कशा प्रकारे मदत करता येईल यासाठी यातील निवडक उद्योजकांची टास्क फोर्ससुद्धा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यात वैद्यकीय उपकरणे, लस, ऑक्सिजन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मदतीच्या स्वरूपात केला जाणार आहे. अमेरिकेतील कंपन्यांची भारतात मोठी गुंतवणूक आहे. विशेषत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे.

कोरोनाचे थैमान! आता घरातही मास्क घालण्याची वेळ: केंद्र सरकारचा गंभीर इशारा  

ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सची प्रचंड गरज

आताच्या घडीला रताला ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सची प्रचंड गरज आहे. येत्या काही आठवड्यात २० हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स भारताला पुरवले जातील. तसेच एक हजार ऑक्सिजन मशीन या आठवड्यात भारतात पोहोचतील, असे सांगितले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात करोना संकट निवारणासाठी झालेल्या चर्चेवर या बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले. 
 

Web Title: coronavirus 40 american companies ceo form task force to help india in corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.