नवी दिल्ली: देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, देशभरातील २५ राज्यांत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाना दिलासा मिळाला असून, केंद्राकडून ८९२३.८ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. (coronavirus finance ministry releases rs 8923 crore for rural local bodies in 25 states)
अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने २५ राज्यांतील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरीत करण्यात आला असून, हा निधी गाव, तालुका आणि जिल्हा या पंचायत राज्यांच्या तिन्ही स्तरांसाठी वितरीत करण्यात आला आहे. याचा विनियोग या सर्व स्थानिक संस्था, इतर उपाययोजनांसह कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी करू शकतील, असे सांगितले जात आहे.
अनिल अंबानींना दिलासा! ४ हजार कोटींच्या तोट्यानंतर ‘या’ कंपनीला भरघोस नफा
अनटाईड ग्रँटस पहिला हप्ता
केंद्र सरकारकडून शनिवारी वितरीत करण्यात आलेला निधी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीच्या अनुदान म्हणजेच अनटाईड ग्रँटसचा पहिला हप्ता आहे. तीन स्तरीय स्थानिक संस्थांना यामुळे कोरोना संकटाचा मुकाबला करण्याच्या संसाधनांचा यथायोग्य वापर करण्यासाठी हा निधी सहाय्यक होईल. यानिधी वाटपाची राज्य निहाय यादी देण्यात आली आहे.
याला म्हणतात बंपर ऑफर! Vivo V21 5G फक्त ६५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन जा...
आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदानाचा हप्ता
वित्त आयोगाच्या शिफारशीप्रमाणे अनुदानाचा पहिला हप्ता राज्यांना जून २०२१ मधे मिळणार होता. परंतु पंचायत राज मंत्रालयाच्या शिफारशीनुसार आताच्या घडीला सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे हा निधी निर्धारीत केलेल्या सर्वसाधारण वेळेआधीच वितरीत करण्यात आला आहे. याशिवाय, वित्त आयोगाने या संयुक्त अनुदान निधीवर काही बंधने आणली गेली होती. परंतु आताची परिस्थिती लक्षात घेता ही अट पहिल्या हप्त्यासाठी शिथील करण्यात आली आहे.
“राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.