नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला असून, अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. तसेच देशात टाळेबंदी असल्यानं कंपन्या कर्मचाऱ्यांना पगार देणार कुठून या विवंचनेत आहेत. त्यामुळे अनेकांना नोकरी जाण्याचीही भीती सतावते आहे. देशाची अर्थव्यवस्थाही कोलमडली असून, महसूलही येणं जवळपास बंद झालेलं आहे. बऱ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केलेलं आहे. पण अशी एक कंपनी आहे, जी या संकटाच्या काळातही कर्मचाऱ्यांना बोनस देणार आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीने (HCL Technology) आपल्या दीड लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केलेली नाही. तसेच गेल्या वर्षींचा बोनसही कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय एचसीएल टेक्नॉलॉजीने घेतला आहे. कोरोनामुळे कंपनी संकटातून जात असली तरी कर्मचाऱ्यांना त्याची झळ बसू देणार नाही, असा निर्धार कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे अशा परिस्थितीतही कंपनी 15000 फेशर्सना नोकरी देणार आहे.
सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी एचसीएल टॅक्नॉलॉजीने यापूर्वी 15000 फ्रेशर्संना नोकरी देणार असल्याचं सांगितलं आहे. वित्तीय वर्ष 2015 च्या योजनेनुसार हे वर्ष 15000 फ्रेशर्सना नोकरी देईल. पण यासाठी काही वेळ जाऊ शकतो, असंही कंपनीनं सांगितलं आहे. कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी अपेरो व्हीव्ही म्हणतात की, कंपनीचे प्रकल्प रद्द झालेले नाहीत.
अद्याप कंपनीला सुमारे 5000 लोकांची आवश्यकता आहे, ज्यासाठी भरती चालू आहे. कोरोना संकटामुळे वाहतुकीवर आणि उत्पादनावर परिणाम होत आहे. ग्राहकांसाठीही ही कठीण वेळ आहे. 2008च्या मंदीच्या वेळी कर्मचार्यांचे पगार कापले गेले नव्हते आणि आता केले जाणार नसल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर 12 महिन्यांच्या कामाचा मोबदला असलेला बोनस न देणं हा चुकीचा निर्णय ठरेल, असंही कंपनीनं सांगितलं आहे.
हेही वाचा
जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी
घाबरू नका! पुन्हा येणाऱ्या कोरोना लाटेचं आता नो टेन्शन, अभ्यासात नवा खुलासा
...म्हणून रशियातल्या 'त्या' नर्सनं पीपीईखाली फक्त अंतर्वस्त्रं घातली; कारण वाचून व्हाल अवाक्
पाकला चुना! चिनी कंपन्यांनी 60 अब्जांची गुंतवणूक करून कमावला 400 अब्ज रुपयांचा नफा
CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका