Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?

पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?

भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल 5 रुपयांपेक्षा महाग झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:17 PM2020-06-16T12:17:43+5:302020-06-16T12:21:32+5:30

भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल 5 रुपयांपेक्षा महाग झाले आहे.

crude oil pric cheaper than water why petrol prices rise over rs 5 per litre since resumption of daily revision | पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?

पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?

Highlightsपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सलग दहाव्या दिवशी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर आता प्रति लिटर 76.73 पैसे आहेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र, पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशांकडून  (OPEC-Organization of the Petroleum Exporting Countries) कच्च्या तेलाचे उत्पादन घटल्यानंतर, या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत.

ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 39 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर, भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल 5 रुपयांपेक्षा महाग झाले आहे. दरम्यान,  तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर, अजूनही पॅक केलेल्या पाण्याच्या बाटलीपेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. तर, देशातील किंमती 21 महिन्यांत सर्वाधिक वाढल्या आहेत.

व्हीएम पोर्टफोलिओचे संशोधन प्रमुख विवेक मित्तल यांनी एका न्यूज पोर्टला सांगितले की, सरकारने मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइड ड्युटी प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढविली आहे. यानंतरही तेल कंपन्यांनी किंमतीवरील कर वाढविला नाही. त्यामुळे आता कंपन्या पेट्रोलच्या किंमती दररोज वाढवत आहेत. याशिवाय लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अचानक पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढ होत आहे. रुपया घसरल्यामुळे तेल कंपन्यांची चिंताही वाढली आहे. लॉकडाऊन दरम्यान तेल कंपन्यांचे नुकसान झाले. त्यामुळे तेल कंपन्या आता ही नुकसान भरपाई करत आहेत.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सलग दहाव्या दिवशी वाढ झाली आहे. दिल्लीत आज डिझेलचे दर 75 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेले आहेत. डिझेलमध्ये आज प्रति लिटर 57 पैशांची वाढ झाली आहे. यात दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत वाढून 75 रुपये 19 पैसे झाली आहे. सोमवारी, 15 जून रोजी एक लिटर डिझेलची किंमत 74 रुपये 62 पैसे होती. सोमवारी डिझेलच्या किंमतीत 59 पैशांची वाढ करण्यात आली. याचबरोबर, आज पेट्रोलच्या किंमतीत 47 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर आता प्रति लिटर 76.73 पैसे आहेत. काल म्हणजेच सोमवारी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 48 पैशांची वाढ झाली आली. सोमवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 76.26 रुपयांना मिळत होते.

आणखी बातम्या....

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार

"अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

"हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे", आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल

Web Title: crude oil pric cheaper than water why petrol prices rise over rs 5 per litre since resumption of daily revision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.