Join us  

243 लाख काेटींचे ‘साम्राज्य’ धाेक्यात; सरकार उचलणार कठोर पावले, दिलासा मिळण्याची शक्यता नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 1:37 PM

सरकारने सुरुवातीपासून क्रिप्टाेबाबत सावध भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्वत: काही वेळा क्रिप्टाेबाबत सावधानतेचा इशारा संपूर्ण जगाला दिला आहे.

नवी दिल्ली : जगातील सर्वांत माेठ्या क्रिप्टाे एक्स्चेंजपैकी एक असलेले एफटीएक्स हे एका रात्रीत उद्ध्वस्त झाले. सुमारे ३२ अब्ज एवढ्या गुंतवणुकीचे मूल्य क्षणात शून्य झाले. क्रिप्टाेच्या विश्वात अनेकवेळा असे प्रकार घडले आहेत. त्यात अनेक भारतीयही पाेळले आहेत. या घडामाेडींमुळे सरकार अलर्ट झाले असून, क्रिप्टाेबाबत ठाेस निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

सरकारची भूमिकासरकारने सुरुवातीपासून क्रिप्टाेबाबत सावध भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्वत: काही वेळा क्रिप्टाेबाबत सावधानतेचा इशारा संपूर्ण जगाला दिला आहे. त्यातच एफटीएक्स एक्स्चेंज उद्ध्वस्त झाल्यामुळे भारताच्या भूमिकेवर एकप्रकारे शिक्कमाेर्तब झाले आहे. 

पैसा बुडाला एफटीएक्समध्ये अनेक भारतीयांचाही पैसा बुडाला आहे. त्यामुळे सरकार क्रिप्टाेला मान्यता देण्याच्या विचारात नसून, याबाबतचे नियम कठाेर केले जाऊ शकतात. पुढील अर्थसंकल्पात सरकार धाेरण स्पष्ट करू शकते.

गुंतवणुकीबाबत हमी नाही, धोका वाढलागेल्यावर्षी क्रिप्टाेचा उद्याेग सुमारे २४३ लाख काेटी एवढा हाेता. मात्र, वर्षभरात अनेक क्रिप्टाे चलन काेसळले आहेत. गुंतवणुकीबाबत काेणतीही हमी नाही. त्यामुळे यामध्ये धाेका प्रचंड वाढला आहे.

भारत सेट करू शकताे अजेंडा- भारताला पुढील वर्षी हाेणाऱ्या जी२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. अशा वेळी क्रिप्टाेबाबत धाेरण सादर करून भारत या व्यासपीठावरून एक अजेंडा सेट करू शकताे.- क्रिप्टाेसंदर्भात भारताकडून एक नियामक चाैकट मांडली जाऊ शकते. त्यातून जगासाठी भारताचा आदर्श निर्माण हाेईल.- क्रिप्टाेला मान्यता न देतानाच त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर माेठा कर आकारावा.  

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीगुंतवणूकनरेंद्र मोदीकेंद्र सरकार