Lokmat Money >क्रिप्टोकरन्सी > क्रिप्टो गुंतवणूकदार चिनी एक्स्चेंजकडे; भारतात कर लावण्याचा परिणाम

क्रिप्टो गुंतवणूकदार चिनी एक्स्चेंजकडे; भारतात कर लावण्याचा परिणाम

बाजार गुप्तचर संस्था ‘सेन्सर टॉवर’ने जारी केलेल्या डेटामधून ही माहिती समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 11:38 AM2022-09-17T11:38:43+5:302022-09-17T11:39:42+5:30

बाजार गुप्तचर संस्था ‘सेन्सर टॉवर’ने जारी केलेल्या डेटामधून ही माहिती समोर आली आहे.

Crypto Investors Toward Chinese Exchanges; Effect of taxation in India | क्रिप्टो गुंतवणूकदार चिनी एक्स्चेंजकडे; भारतात कर लावण्याचा परिणाम

क्रिप्टो गुंतवणूकदार चिनी एक्स्चेंजकडे; भारतात कर लावण्याचा परिणाम

नवी दिल्ली : भारत सरकारने क्रिप्टो चलनाच्या व्यवहारांवर १ एप्रिलपासून ३० टक्के कर तसेच १ जुलैपासून १ टक्का टीडीएस लावल्यानंतर देशातील प्लॅटफॉर्मवरील क्रिप्टो व्यवहार ९० टक्क्यांनी घटले आहेत. मात्र, याचवेळी एक नवीन कलही समोर आला असून, मागील अडीच महिन्यांत देशातील क्रिप्टो गुंतवणूकदार मोठ्या संख्येने चिनी एक्स्चेंजकडे स्थानांतरित झाले आहेत.

बाजार गुप्तचर संस्था ‘सेन्सर टॉवर’ने जारी केलेल्या डेटामधून ही माहिती समोर आली आहे. क्रिप्टो व्यवसायातील चिनी कंपनी ‘बायनान्स होल्डिंग्ज’चे भारतातील डाऊनलोड ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात वाढून ४.२९ लाख झाले आहे. प्रतिस्पर्धी एक्स्चेंज ‘क्वाइनडीसीएक्स’च्या तुलनेत हा आकडा तिपटीने अधिक आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये बायनान्सचे डाऊनलोड वाढले आहे. 

जगातील सर्वांत मोठे क्रिप्टो एक्स्चेंज
बायनान्स हे जगातील सर्वांत मोठे क्रिप्टो एक्स्चेंज असून, भारतातही ते अन्य एक्स्चेंजच्या पुढे निघून गेले आहे. कमी शुल्क आणि पैशांची सुलभ देवाण- घेवाण हे बायनान्सच्या यशाचे गमक आहे.

करचोरीसाठी वापर
बायनान्सचे संस्थापक चांगपेंग झाओ यांनी अनेक प्रोत्साहन प्रस्तावही एक्स्चेंजवर ठेवले आहेत. बायनान्स आणि एफटीएक्स या प्लॅटफॉर्मवर कर कपात होत नाही. त्यामुळे करचोरीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करू लागले आहेत. 

कराबाबत संदिग्धता
स्वीत्झर्लंडच्या ‘सेबा बँक एजी’ची भारतीय शाखा ‘सेबा इंडिया’चे सीईओ रोहन मिश्रा यांनी सांगितले की, टीडीएस नेमका कशावर लागू असेल, हे अजूनही स्पष्ट नाही. 

बायनान्सवर चीनमध्ये बंदी
चीनमध्ये स्थापन झालेल्या बायनान्सवर चीनमध्ये मात्र व्यवसाय करण्यावर बंदी आहे. २०१७ मध्ये चीन सरकारने ही बंदी घातली होती. चिनी नागरिक बायनान्सवर खातेही उघडू शकत नाही. त्यानंतर बायनान्सने केमॅन आयलँडमध्ये नोंदणी केली. सध्या कंपनी माल्टा, सिंगापूर आणि बरमुडा येथून व्यवसाय करते. 

Web Title: Crypto Investors Toward Chinese Exchanges; Effect of taxation in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.