Join us

व्हॅलेंटाईन सप्ताहात सिंगल लोकांनी सावध! स्वीटहार्ट, एंजेल प्रिया टाकतायेत प्रेमाचं जाळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:37 IST

online dating : व्हॅलेटाईन सप्ताहात सायबर गुन्हेगारांनी सिंगल लोकांना सावज बनवण्यास सुरुवात केली आहे. सरकारने याची दखल घेतली असून मोबाईल वापरकर्त्यांना आवाहन केलं आहे.

online dating : सध्या व्हॅलेटाईन डे अर्थात प्रेमाचा सप्ताह सुरू आहे. सगळीकडे कसे गुलाबी वातावरण पाहायला मिळत आहे. पर्यटन स्थळ, सार्वजिनिक बागा, गार्डनमध्ये प्रेमी जोडप्यांची संख्या वाढली आहे. हा महिना सिंगल लोकांसाठी कठीण मानला जातो. सर्वजण सिंगल असल्यावरुन खिल्ली उडवताना दिसता. सिंगल लोकांवरील मीम आणि रिल्सही व्हायरल होत आहेत. अशा परिस्थिती एकटेपणा घालवण्यासाठी तुम्ही कुठल्या डेटींग अ‍ॅपचा आधार घेणार असाल तर सावध व्हा. वास्तविक, प्रेमाच्या सप्ताहातदरम्यान, एंजल प्रिया आणि ऑनलाइन स्वीटहार्ट सारख्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. हा ऑनलाइन रोमान्स लोकांचे खिसे कापत आहे.

हनीट्रॅपपासून सावध राहण्यासाठी सरकारकडून आवाहनव्हॅलेटाईन डे वीकमध्ये पार्टनर शोधण्यासाठी अनेकजण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आधार घेत आहेत. याच संधीचा फायदा उचलत सायबर गुन्हेगार हनीट्रप लावत आहेत. यामध्ये अनेकजण अडकले असून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. इंडियन सायबर क्राईमने अशा लोकांना व्हॅलेंटाईन वीक दरम्यान सावध राहण्याचे आवाहन केले आहे. I4C ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, डेटिंग स्कॅम एंजेल प्रिया प्रेमाच्या नावावर तुमची फसवणूक करू शकते. जर तुम्हाला डेटिंग साइटवर असं कोणी भेटलं, जे  तुम्हाला गुंतवणूक आणि उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवत असेल तर काळजी घ्या.

हनीट्रॅप कसा आखला जातो?

  • तुम्ही संबंधित अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर एखादी तरुणी तुम्हाला संपर्क साधते.
  • तुमच्यातील बोलणं वाढल्यानंतर प्रेमात पडल्याचे नाटक केलं जातं.
  • या मुलींचं बोलणं इतकं लाघवी असतं की कुणीही त्यांच्या प्रेमात पडेल.
  • एकदा विश्वास संपादन केल्यानंतर तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले जाते.
  • जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुमच्यासोबत ब्रेकअप केलं जातं. विशेष म्हणजे पुरुषच मुलींचं नाव वापरुन हे कांड करत असतात.

मोठ्या परताव्याच्या मोहाला बळी पडू नकाजर कोणी कमी वेळात जास्ता पैसे देण्याचे आमिष दाखवत असेल तर सावधा व्हा. अनेक प्रकरणांमध्ये तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला परतावा दिला जातो. तुमचा आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही मोठी रक्कम गुंतवता आणि फसता. त्यामुळे कुठल्याही योजनेत पैसे गुंतवताना योग्य तपास केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. जर तुमच्यासोबत अशी घटना घडली तर cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता. किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देऊ शकता.

टॅग्स :सायबर क्राइमव्हॅलेंटाईन्स डेव्हॅलेंटाईन वीकक्रिप्टोकरन्सी