Lokmat Money > बिझनेस न्यूज > Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

Defence Stock: सरकारी संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. याआधी जुलै आणि ऑगस्टमध्ये कंपनीच्या शेअर्सनी उच्चांकी पातळी गाठली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 04:28 PM2024-11-27T16:28:09+5:302024-11-27T16:28:09+5:30

Defence Stock: सरकारी संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. याआधी जुलै आणि ऑगस्टमध्ये कंपनीच्या शेअर्सनी उच्चांकी पातळी गाठली होती.

Defense stocks once again buoyant experts bullish hal cochin shipyard bel mazgaon dock See what the new target prices are | Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

Defence Stock: सरकारी संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. याआधी जुलै आणि ऑगस्टमध्ये कंपनीच्या शेअर्सनी उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र, त्यानंतर बड्या कंपन्यांच्या शेअरमध्ये ३५ ते ४० टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. परंतु एकदा आता या स्टॉक्समध्ये तेजी दिसून येत आहे.

कोचिन शिपयार्ड - संरक्षण क्षेत्रातील कंपनी कोचीन शिपयार्डच्या शेअर्सना सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किट लागलं आहे. माझगाव डॉक, गार्डन रीच, हिंदुस्थान एरोनॉटिक्स या कंपन्यांच्या शेअर्सची मागणीही पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स - सीएनबीसी टीव्ही १८ च्या वृत्तानुसार, ट्रेडबुल्स सिक्युरिटीज सच्चिदानंद उत्तेकर यांच्या मते येत्या काळात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरची किंमत ५१०० रुपये ते ५३०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यांनी गुंतवणूकदारांना ४२८० रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आज कंपनीचे शेअर्स कामकाजाच्या अखेरिस ४४८६ रुपयांवर बंद झाला.

भारत इलेक्ट्रॉनिक्स - भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरनं बुधवारी बीएसईवर ३०७.०५ रुपयांचा उच्चांक गाठला. या शेअरच्या कामगिरीबाबत एक्सपर्ट बुलिश दिसून येत आहेत. त्यांनी या शेअरसाठी ३२५ रुपयांचं टार्गेट प्राईज ठेवली आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स - आज माझगाव डॉकच्या शेअरच्या किंमतीत ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमती तब्बल ८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. आज कंपनीचे शेअर्स ४,४८८.९० रुपयांवर पोहोचलेत. तज्ज्ञांच्या मते कंपनीचे शेअर्स ५१०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात.

(टीप - यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Defense stocks once again buoyant experts bullish hal cochin shipyard bel mazgaon dock See what the new target prices are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.