Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुम्हीही UPI चा वापर करता? पुढच्या आठवड्यापासून होणार मोठा बदल

तुम्हीही UPI चा वापर करता? पुढच्या आठवड्यापासून होणार मोठा बदल

UPI New Rules : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI व्यवहारातील बदल केला आहे. पुढील आठवड्यापासून हा बदल लागू होणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 06:46 PM2024-09-15T18:46:27+5:302024-09-15T18:48:15+5:30

UPI New Rules : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI व्यवहारातील बदल केला आहे. पुढील आठवड्यापासून हा बदल लागू होणार आहे. 

Do you also use UPI? Big change coming from next week | तुम्हीही UPI चा वापर करता? पुढच्या आठवड्यापासून होणार मोठा बदल

तुम्हीही UPI चा वापर करता? पुढच्या आठवड्यापासून होणार मोठा बदल

UPI Rule Update : जर तुम्ही युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे यूपीआयचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. यूपीआयमध्ये लवकरच एक मोठा बदल होणार आहे. सरकारने एक परिपत्रकातून याबद्दलची माहिती दिली आहे. कर भरणा करणाऱ्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देशातील लाखो करदात्यांना यूपीआय व्यवहारातील नव्या बदलाचा फायदा होणार आहे. करदाते आहेत, ते आता ५ लाखांपर्यंत  रक्कम यूपीआयद्वारे पाठवू शकणार आहेत. 

एनपीसीआयने काय म्हटले आहे?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यासंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. २४ ऑगस्ट २०२४ रोजी काढण्यात आलेल्या या परिपत्रकात म्हटले आहे की, यूपीआय एक लोकप्रिय व्यवहारासाठी पद्धत म्हणून वाढत आहे. त्यामुळे काही विशेष श्रेणींसाठी यूपीआय व्यवहाराची मर्यादा वाढवण्याची गरज आहे. करदात्यांसाठी यूपीआय पेमेंटची मर्यादा ५ लाख रुपये करण्यात आली आहे. 

NPCI ने बँकांना दिले निर्देश

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय सेवा पुरवठादार आणि युपीआय अ‍ॅप्सनी व्यापाऱ्यांची एमसीसी ९३११ कॅटेगरीतील देवाण-घेवाण मर्यादा वाढवण्यात येईल, याची खात्री करून घ्यावी. १५ सप्टेंबरपासून हे लागू करण्यास सांगण्यात आले आहे म्हणजे १६ सप्टेंबरपासून ५ लाखांपर्यंतचे व्यवहार कर भरणा करणाऱ्यांना करता येणार आहेत.

Web Title: Do you also use UPI? Big change coming from next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.