Lokmat Money > बिझनेस न्यूज > ईपीएफ-९५ च्या पेन्शनची रक्कम अर्थसंकल्पात वाढणार?, २५00 ते ५000 रुपयांपर्यंत वाढ होणे शक्य

ईपीएफ-९५ च्या पेन्शनची रक्कम अर्थसंकल्पात वाढणार?, २५00 ते ५000 रुपयांपर्यंत वाढ होणे शक्य

गेल्या २१ डिसेंबरला श्रममंत्री गंगवार यांनी संघर्ष समितीच्या प्रतिनिधीशी चर्चा केली व प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देऊन अर्थमंत्रालयाला पाठवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 05:41 AM2020-01-31T05:41:24+5:302020-01-31T05:42:02+5:30

गेल्या २१ डिसेंबरला श्रममंत्री गंगवार यांनी संघर्ष समितीच्या प्रतिनिधीशी चर्चा केली व प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देऊन अर्थमंत्रालयाला पाठवला.

EPF-95 pension amount to increase in budget? Can be increased from Rs. 2500 to 5000 | ईपीएफ-९५ च्या पेन्शनची रक्कम अर्थसंकल्पात वाढणार?, २५00 ते ५000 रुपयांपर्यंत वाढ होणे शक्य

ईपीएफ-९५ च्या पेन्शनची रक्कम अर्थसंकल्पात वाढणार?, २५00 ते ५000 रुपयांपर्यंत वाढ होणे शक्य

- सोपान पांढरीपांडे

नागपूर : शनिवारी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात एम्प्लॉईज प्रॉव्हिडंड फंडची (ईपीएफ-९५) पेन्शन वाढू शकते, अशी माहिती ईपीएफ पेन्शनधारक संघर्ष समितीचे प्रमुख कमांडर अशोक राऊत यांनी दिली. ‘लोकमत’ला त्यांनी सांगितले, संघर्ष समितीने आॅगस्ट २०१९ मध्ये पेन्शन कशी वाढू शकते याचा विस्तृत प्रस्ताव श्रम मंत्रालयाला सादर केला होता.
गेल्या २१ डिसेंबरला श्रममंत्री गंगवार यांनी संघर्ष समितीच्या प्रतिनिधीशी चर्चा केली व प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देऊन अर्थमंत्रालयाला पाठवला. सध्या ईपीएफ अंतर्गत किमान पेन्शन १००० व कमाल २५०० आहे. ती वाढली तर ६५ लाख पेन्शनधारकांचा फायदा होईल, असे राऊत म्हणाले, परंतु पेन्शन किती वाढेल हे सांगण्यास नकार दिला.

Web Title: EPF-95 pension amount to increase in budget? Can be increased from Rs. 2500 to 5000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.